Ticker

6/recent/ticker-posts

गांजा विक्रेत्यावर मालेगांव पोलीस कारवाईत दोन आरोपी व १,३८,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त.



मालेगाव (तालुका प्रतिनिधी)-ःजावेद धन्नू भवानीवाले

मालेगाव: अकोला येथुन मेडशी येथे एक महिला आणि एक मुलगा गांजा विक्रीसाठी घेवुन येणार असल्याचे खात्रीलायक मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा लावून दोन आरोपी आणि त्यांच्या कडील १,३८,००० रूपये किंमतीचा गांजा सह आरोपींना ताब्यात घेतले.

   पोलीस अधिक्षक वाशिम यांनी वाशिम जिल्हयामध्ये मोठया प्रमाणात अंमलीपदार्थ विरोधी कारवाई करण्याच्या सुचना सर्व ठाणेदारांना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे मालेगांवचे ठाणेदार संजय चौधरी यांनी मालेगांव पोलीसांचे एक पथक स्थापन करून त्यानुसार अंमलीपदार्थों विरोधी कारवाईच्या सुचना दिल्या व त्यानुसार गोपनिय बातमीदार नेमण्यात आले होते. दि. १९/०५/२०२५ रोजी गोपनिय बातमीदारांकडून माहिती मिळाली की, अकोला येथुन मेडशी येथे एक महिला आणि एक मुलगा गांजा विक्रीसाठी घेवुन येणार आहे.

   त्यानुसार याबाबत पोलीस अधिक्षक, वाशिम, अपर पोलीस अधिक्षक, वाशिम, सहायक पोलीस अधिक्षक, उपविभाग वाशिम यांना सदरची माहिती देवुन त्यांचे मार्गदर्शनात छापा कारवारईसाठी पथक नेमण्यात आले व पोलीस उप निरीक्षक संतोष हिंगे, पोलीस उप निरीक्षक रवि सैवेवार, महिला पोलीस उप निरीक्षक शिल्पा लोंढे, पोलीस हवालदार सुनिल पवार, पोलीस हवालदार शिवाजी काळे, ना. पोलीस कॉन्स्टेबल विजेंद्र इंगोले, पोलीस कॉन्स्टेबल जयशंकर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पवार, पोलीस कॉन्स्टेबल गणेश मेटांगळे असे पोलीस पथक नेमण्यात आले व त्यांना ठाणेदार संजय चौधरी यांनी कारवाईबाबतच्या सुचना दिल्या. त्यानुसार सदर पथकाने सापळा रचुन अकोला- मेडशी बायपासवरील मेडशी बस स्थानक येथे आरोपी महिला नामे मनकर्णा मोहन जाधव, वय ६० वर्ष, रा. हनवतखेडा, ता. मालेगांव, जि. वाशिम आणि तिच्यासोबत अभिषेक गजानन ठाकरे, वय २० वर्ष, रा. खेर्डा, ता. मंगरूळपीर, जि. वाशिम यांना ११.५०० कि.ग्रॅ. चा गांजा किं. १३८,०००/- रू. सह पकडला आणि आरोपींना गांजासह ताब्यात घेतले. घटनास्थळ पंचनामा कारवाई व ईतर कायदेशीर तरतुदी पुर्ण करून मालेगांव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिष्टर नंबर २७०/२०२५ कलम ८ (सी), २० एनडीपीएस कायदा १९८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास ठाणेदार संजय चौधरी यांचे मार्गदर्शनात पोउपनि दिलीप रहाटे करत आहेत. सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधिक्षक लता फड , सहायक पोलीस अधिक्षक नवदिप अग्रवाल यांचे मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक संतोष हिंगे, पोलीस उप निरीक्षक रवि सैबेवार, महिला पोलीस उप निरीक्षक शिल्पा लोंढे, पोलीस हवालदार सुनिल पवार, पोलीस हवालदार शिवाजी काळे, ना. पोलीस कॉन्स्टेबल विजेंद्र इंगोले, पोलीस कॉन्स्टेबल जयशंकर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पवार, पोलीस कॉन्स्टेबल गणेश मेटांगळे यांनी सदरची छापा कारवाई केली.