Ticker

6/recent/ticker-posts

छावा महाराष्ट्र सेनेच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हाप्रमुख पदी साईनाथ कर्डिले



 अंबड प्रतिनिधी,  गणेश सपकाळ 

छावा महाराष्ट्र सेनेची नुकतीच पैठण येथे दि.११मे रोजी महत्वाची बैठक पार पडली.या बैठकीत मराठा आरक्षण,सहकार,शेतकरी,आरोग्य,शिक्षण,कामगार व संघटनेचे ध्येयधोरणे व विविध आंदोलन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.याप्रसंगी सामाजिक चळवळीतील साईनाथ कर्डिले यांची जिल्हाप्रमुख पदी सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली.या निवडीचे नियुक्ती पत्र छावा महाराष्ट्र सेनेचे प्रमुख किशोर पाटील शिरवत यांच्या हस्ते देण्यात आले.तसेच उर्वरित पदाधिकारी प्रवेश सोहळा व नियुक्ती पत्र कार्यक्रम घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे लवकरच विभागीय बैठक घेणार असल्याची माहिती छावा सेना प्रमुख किशोर पाटील शिरवत यांनी दिली.

यावेळी मराठवाडा अध्यक्ष मनोज मुरदारे,जालना जिल्हाप्रमुख राम पाटील माने,किरण काळे,अशोक टेके,संतोष कुशेकर,संजय मरकड,फिरोज पटेल,शेखर मात्रे यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती.