बुध दि .[प्रकाश राजेघाटगे]
बिटलेवाडी (ता.खटाव) येथील ओंकार शंकर बिटले याची मर्चंट नेव्हीमध्ये थर्ड ऑफिसर पदी निवड झाली. एका सर्व सामान्य कुटुंबातील व दुर्गम भागातील युवकाने मर्चंट नेव्हीमध्ये ऑफिसर होण्याचा मान मिळवत्याबद्दल सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
येथील माजी सैनिक शंकर बिटले यांचा मुलगा ओंकार याला लहानपणापासूनच नेव्ही बद्दल विशेष आकर्षण होते. त्यावेळी ते भारतीय सेनादलात देशसेवेच्या निमित्ताने देशातील विविध भागात कर्तव्य बजावत होते. वडिलांच्या कडून शौर्याच्या गोष्टी ऐकून ओंकारलाही लहानपणापासून साहसी गोष्टींची आवड निर्माण झाली. गाव खेडं आणि दुर्गम भागात असल्याने मुलाच्या आवडीनिवडी ओळखून वडिल शंकर यांनी पत्नी वैशाली, ओंकार व छोटा कुणालला गावातून शिक्षणाच्या निमित्ताने सातारला आणले व ओंकारला साताऱ्यातील छत्रपती शाहू अकॅडमीत दाखल केले. ओंकार इयत्ता पहिली पासूनच शाळेत नेत्रदीपक कामगिरी बजावत राहिला. इयत्ता दहावीच्या परीक्षेत त्याने ८७ टक्के तर बारावीत ७७ टक्के गुण मिळवले.
त्यानंतर त्याने पुणे येथील तुलानी मरीन इन्स्टिट्यूट मध्ये तीन वर्षाचा नॉटिकल सायन्स चा कोर्स पूर्ण केला. कोर्स पूर्ण झाल्यानंतर ओंकारने मर्चंट नेव्हीमध्ये भरती झाला व तीन वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षणादरम्यान त्याने बजावलेली उत्तम कामगिरीची दखल घेत त्याची थर्ड ऑफिसर या महत्वाच्या गणल्या गेलेल्या पदी निवड करण्यात आली. हे मर्चंट नेव्हीमधील तिसऱ्या क्रमांकाचे अधिकारी पद आहे.
माझे शिक्षणच व बाळगलेले स्वप्न साकार होण्यासाठी माझ्या मम्मी - पप्पांनी प्रचंड कष्ट व त्याग केला आहे त्यामुळे तेच या यशाचे मानकरी आहेत. असे आई-वडील लाभणे भाग्याची गोष्ट आहे. सर्वांनाच असे आई-वडील मिळाले, तर दुर्गम भागातील एकही मूल अशिक्षित राहणार नाही अशी प्रतिक्रिया ओंकारने दिली.





Social Plugin