Ticker

6/recent/ticker-posts

पाटण तालुक्यातील मेंढोशी येथील आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद



पाटण (दिनकर वाईकर) 

पाटण तालुक्यातील मणदुरे विभागातील केरळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्र मेंढोशी ता, पाटण येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते

या शिबिराला मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या आरोग्य शिबिरामध्ये एकूण 105 लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आज-काल वाढत्या हृदय रोगाच्या समस्या लक्षात घेता त्यामध्ये 41 संशयित रुग्णांची ईसीजी काढण्यात आले त्यापैकी फक्त तीनच रुग्णांना पुढील संदर्भ एनसीडी  कार्यक्रमांतर्गत उच्च रक्तदाब मधुमेह मूख कर्करोग स्थनाचा कर्करोग व रक्ताच्या तपासण्या करण्यात आल्या

मिशन तेजस्विनी कार्यक्रमाच्या अनुषंगाने 18 वर्षावरील गावातील सर्व महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली जागतिक हिवताप दिनाचे औचित्य साधून हिवतापाबद्दल जनजागृती व माहितीही देण्यात आली

यावेळी कार्यक्रमास मेंडोशी गावचे सरपंच व ग्रामस्थ प्राथमिक आरोग्य केंद्र केरळ तालुका पाटण  च्या द्वितीय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्नेहा हुंदरे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर सूर्यकांत पाटील आरोग्य सहाय्यक आरोग्य सेविका आरोग्य सेवक उपकेंद्र मेनडोशी अंतर्गत सर्व अशा स्वयंसेविका प्रयोगशाळा तंत्रज्ञ अर्धवेळ स्त्री परिचर व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते