Ticker

6/recent/ticker-posts

कापणी साठी ठेवलेला कांदा पाऊसाने भिजला. आंबा गळुन पडला!

वाडेगाव परिसरातील चित्र!


राजकुमार चिंचोळकर बाळापूर 

दिनांक सहा मे रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास तालुक्यातील वाडेगाव परिसरात मेघगर्जना तसेच वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस पडल्याने कापणी साठी ठेवलेला कांदा पाऊसाने भिजला तर आंबा सुद्धा झाडाचा गळुन पडला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे सध्याच्या परिस्थितीत उन्हाळी कांदा काढून कापनी करीता शेतातच पगर लावून ठेवलेला असून पडलेल्या वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस पडल्याने कांदा पाण्याने भिजल्याचे चित्र निर्माण झाले आहे त्यासोबतच वादळीवाऱ्यामुळे झाडाचे आंबे गळुन पडले असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे आंबा पीका सह कांदा पीकांचे नुकसान होत असल्याने संमधीत उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे मुळात यावर्षीच्या हंगामातील उन्हाळी कांद्याची प्रतवारी घसरलेली असल्याने कांदा पीकाच्या उत्पादनावर परिणाम होवून उत्पादनात घट निर्माण होत असल्याने समाधानकारक कांदा पीकांचे उत्पादन जवळपास दुरापास्त झाले आहे त्यामुळे खरीप तसेच रब्बी हंगामातील पीकांचे निसर्गाच्या अवकृपेमुळे झालेल्या किंवा होत असलेल्या शेतातील वर्गाच्या अडचणीत भरीस भर पडत आहे.


माझा तिन एकर उन्हाळी कांदा काढून कापणी साठी ठेवलेला आहे दोन तीन दिवसांनी कांदा कापणी करावी लागते परंतु पडलेल्या जोरदार पावसामुळे कापणी साठी ठेवलेला कांदा पाऊसाने भिजला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात झालेला खर्च वसूल होईल असे वाटत नाही. -प्रविण लोखंडे  कांदा उत्पादक शेतकरी