कदम गणेश बिलोली प्रतिनिधी.
नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे मिशन उडान अंतर्गत बेरोजगार युवकांसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून आयोजित भव्य रोजगार मेळाव्यामध्ये 3500 युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यास यश आले आहे. नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या पुढाकारातून मिशन उडान अंतर्गत नांदेड जिल्ह्याच्या बेरोजगारांना एक रोजगाराची संधी उपलब्ध करण्याचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमाला युवकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला आणि हा कार्यक्रम यशस्वी ठरला.
Social Plugin