डॉ गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
नुकताच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२५ दहावीचा निकाल जाहीर झाला असून जे.सी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. विशेष बाब म्हणजे विद्यालयाची विद्यार्थिनी श्रुती शशिकांत ठाकूर हिने १०० टक्के प्राप्त करून या निकालात बाजी मारली आहे व संस्कृत मध्ये १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत. तसेच वंशिका विनय चव्हाण ९७.४०% संस्कृत (१००पैकी १००), अधिराज ऋषिकेश चव्हाण ९७.४०% (संस्कृत १०० पैकी १००), प्रणाली कृष्णराव भोयर ९७.४०% (विज्ञान १०० पैकी १००), श्रेया श्रीपादराव रेवाळे ९६.४०%, अनुज प्रमोद कडू ९६.४०% (गणित १०० पैकी १००), अंतरा किसन आसोले ९६.४०%(विज्ञान १००पैकी १००), निधी अमित कुमार रिठे ९६.४०% (विज्ञान १०० पैकी १००),आनंदी मंदार पटवर्धन ९६.४०%, अमृता अरविंद दहापुते ९५.८०%, संस्कृती किशोर आठवले ९५.८०%, प्रणव वैजनाथ चव्हाण ९५.६०%,उर्वशी देवेंद्र आडे ९५.६०% (संस्कृत १००पैकी १००),गौरी योगेश निंभेकर ९५.४०%, सिद्धार्थ श्याम जाधव ९५.२०% (संस्कृत १०० पैकी १००),देवयानी अजय राऊत ९५.२०%, अनुष्का गोपाल राऊत ९५.२०% गुण प्राप्त केले आहे.या परीक्षेकरिता विद्यालयातून एकूण १०४ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यामध्ये प्रावीण्य श्रेणीमध्ये ८०, प्रथम श्रेणीमध्ये २०, तर द्वितीय श्रेणीमध्ये ४ विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.तसेच संस्कृत मध्ये ६विद्यार्थ्यांनी , विज्ञान विषयामध्ये ४ विद्यार्थ्यांनी ,तर गणित विषयामध्ये एका विद्यार्थ्याने १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहे.विषयनिहाय प्रावीण्य बघितल्यास इंग्रजी ९४,मराठी ८२,संस्कृत ६७,विज्ञान ६०,गणित ५८,सामाजिक शास्त्र ८० विद्यार्थ्यांनी प्रावीण्य संपादन केले आहे.तसेच १७ विद्यार्थ्यांनी ९५% च्या वर गुण प्राप्त केले आहे व ३७ विद्यार्थ्यांनी ९०%च्या वर गुण प्राप्त करत घवघवीत यश संपादन केले आहे.
यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कारंजा एज्युकेशन सोसायटीचे सचिव अमोलभाऊ चवरे जे.सी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य भारत हरसुले, आर.जे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अनिता चोपडे,पर्यवेक्षक प्रशांत गंधक व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.
Social Plugin