ठाणेदारांच्या संमतीने सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यांवर कारवाई कुठे?
झरी जामणी (प्रतिनिधी) –
पाटण पोलीस स्टेशनच्या हद्दीत सध्या बेकायदेशीर धंद्यांचे साम्राज्य बिनधास्त पसरत असून, स्थानिक झीरो पोलिसांकडून या धंद्यांवर कारवाई करण्याऐवजी हफ्त्यांची वसुली सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तालुका पातळीवर मटका, जुगार, अवैध दारू विक्रीसह इतर गुन्हेगारी स्वरूपाचे व्यवसाय खुलेआम सुरू आहेत. या सगळ्याला पोलीस प्रशासनाची मूक संमती असल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे, झीरो पोलिसांकडून दररोज हफ्ता वसूल केला जात असून, ही सगळी आर्थिक देवाणघेवाण ठाणेदारांच्या संमतीने आणि माहितीअंतीच होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
अवैध धंद्यांवर कारवाई करण्याऐवजी डोळेझाक करण्याचा ठाणेदारांचा पवित्रा नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण करत आहे. जर पोलीसच हफ्ते घेऊन अवैध धंद्यांना आश्रय देत असतील, तर सामान्य जनतेने न्यायाची अपेक्षा कुणाकडे करायची?
संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.





Social Plugin