Ticker

6/recent/ticker-posts

आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली फडतरवाडी [ बुध] विकास सेवा सोसायटी बिनविरोध, चेअरमनपदी रामदास फडतरे , तर व्हाईस चेअरमनपदी गीताबाई फडतरे यांची निवड



बुध दि [प्रकाश राजेघाटगे] 

खटाव तालुक्यातील राजकीय दृष्टया महत्त्वाची समजली जाणारी  फडतरवाडी (बुध)  विकास सेवा सोसायटी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना . महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली   ग्रामस्थांनी एकत्रित येऊन बिनविरोध केली आहे. फडतरवाडी (बुध) या गावाने बिनविरोध सोसायटी करून  आदर्श निर्माण केला आहे.फडतरवाडी बुध विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी रामदास फडतरे  व व्हाइस चेअरमनपदी गिताबाई फडतरे यांची  बिनविरोध  निवड करण्यात आली  निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब भोसले यांनी काम पाहिले .

यावेळी  रामदास फडतरे, कालिदास फडतरे, तुकाराम जाधव, ज्योतीराम बंडू फडतरे, हरिदास फडतरे , गिताबाई फडतरे सुनंदा फडतरे, महेश बोबडे, गणपत फडतरे, नारायण फडतरे  हे संचालक उपस्थित होते . यावेळी स्वीकृत संचालक म्हणून अशोक फडतरे, शंकर फडतरे या दोघांची निवड करण्यात आली.यावेळी नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन तसेच संचालक मंडळ यांचे अभिनंदन  बाळासाहेब भोसले व सचिव प्रमोद फडतरे,  सरपंच , उपसरंपच , सदस्य  ग्रामस्थांनी यांनी  केले. छायाचित्र _ फडतरवाडी [ बुध] चेअरमन रामदास फडतरे व व्हाईस चेअरमन गीताबाई फडतरे व संचालकांचे अभिनंदन करताना बाळासाहेब भोसले , सचिव प्रमोद फडतरे व . इतर छाया - प्रकाश राजेघाटगे