Ticker

6/recent/ticker-posts

मंगळसा येथे भव्य भजन संध्या कार्यक्रम संपन्न



प्रतिनिधी--संजय भरदुक 

मंगरूळपीर--तालुक्यातील शहराला लागून असलेल्या मंगळसा येथे दिनांक ९ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ८ वाजता श्री महादेव मंदिराचा जिर्णोद्धार व भव्य कळस रोहन समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.तसेच या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर म्हणून श्री श्यामभाऊ खोडे आमदार वाशिम मंपिर विधानसभा मतदारसंघ तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष वाशिम श्री चंद्रकांतदादा ठाकरे , ब्रम्हगिरी महाराज, जि.प.सदस्य चंद्रकांतजी पाकधने, माजी सभापती भास्कराव पाटील शेगीकर यांची मंचावर उपस्थित होती.नंतर आमदार श्री श्यामभाऊ खोडे यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.आणि बहू चर्चित असलेला आदर्श गुरूदेव सेवा भजन मंडळ निमगव्हान ता.चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती यांचा तुकडोजी महाराज यांच्या भजनाचा बहारदार असा कार्यक्रम झाला हजारोंच्या संख्येने भाविक भक्तांची गर्दी होती.अनेक भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.