Ticker

6/recent/ticker-posts

माकडाची शिकार करत असतांना बिबट्या विहीरीमध्ये पडला



 राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस

 दिग्रस : डेहनी ( कलगाव )येथील जंगलाला लागून असलेल्या महादेव फत्तु चव्हाण यांच्या शेत शिवारामध्ये माकडाची शिकार करत असताना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली आहे.आज सकाळी संजय चव्हाण आपल्या जनावराला शेतामध्ये चारावसायास गेला असता विहिरीमध्ये मृतावस्थेमध्ये त्याला माकड दिसून आले. याचवेळी विहिरीमधून वाघाचा डरकाळीचा आवाज ऐकू आला त्याने डोकावून पाहिले असता विहिरीमधील कपारीमध्ये बिबट्या दिसला सदर घटनेची माहिती त्याने गावातील लोक व नातेवाईक यांना दिली. 

सदर घटनेची माहिती मिळताच पुसद वन विभागाचे येथील रेस्क्यू टिमचे दिग्रस येथील कर्मचारी टीम घटनास्थळी पोहोचले आहेत व बिबट्याला जरेबंद करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत अखेर सायंकाळी पाच वाजता बिबट्याला जेरबंद करून बाहेर काढण्यात यश आले. रेस्क्यू पथकाचे मुख्य अधिकारी मुकबीर शेख व वैष्णवी प्रधान वनरक्षक गब्बर राठोड, वनरक्षक गंगाधर पडोळे,वनरक्षक शीलवंत धाडसे, वनरक्षक पवन लांगडे, वन मजूर चमु सिराजखा पठाण, घनश्याम राठोड पथकाला सहकार्य करून बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळविले व बिबट्याला बाहेर काढण्यात आले आहे. याप्रसंगी बिबट्याला पाहण्याकरिता ग्रामस्थांची खूप गर्दी झाली होती.