Ticker

6/recent/ticker-posts

लोणी (ता.खटाव) येथील उपक्रमशील शिक्षक धनकुमार विष्णू शिंदे राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित



बुध  दि . [ प्रकाश राजेघाटगे ] 

शिक्षण क्षेत्रात आपल्या समर्पित कार्याचा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या निष्ठेचा अमिट ठसा उमटवणारे लोणी (ता.खटाव) व सध्या वरसुबाई माध्यमिक विद्यालय, माळेगाव ( ता.मावळ) जिल्हा पुणे येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक धनकुमार विष्णू शिंदे यांना शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल  आविष्कार फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

         हा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भाची डुमुनी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी कोल्हापूरचे प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ.प्रभू,आविष्कार फाउंडेशनचे संस्थापक संजय पवार, राष्ट्रीय महासचिव सुनीता केदार, रंगराव केदार धनकुमार शिंदे यांच्या आई शांताबाई व पत्नी मेघा व इतर मान्यवर उपस्थित होते.

      धनकुमार शिंदे शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करत विविध भूमिका पार पाडल्या आहेत. त्यांनी मावळ तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष म्हणून अनेक वर्षे काम केले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही ते काम पाहत आहेत.धनकुमार शिंदे यांची शिकवण्याची पद्धत अत्यंत सोपी आणि प्रभावी आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना विषय सहजपणे समजतो. केवळ पाठ्यपुस्तकांवर अवलंबून न राहता, ते विद्यार्थ्यांना जगाकडे अधिक व्यापक दृष्टीने पाहण्यासाठी प्रोत्साहित करतात. याशिवाय शिंदे यांनी शाळेतील अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन,विविध शैक्षणिक प्रकल्प आणि विद्यार्थी वाचन लेखन सारख्या कार्यशाळा आयोजित केल्या.गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी त्यांनी नेहमीच मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या शाळेतील शिस्तप्रियता आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक सुरक्षित आणि आनंदी वातावरण निर्माण झाले.