Ticker

6/recent/ticker-posts

झरी जामनी तालुक्यातील आठ शाळा/महाविद्यालयांमध्ये योजना राबविण्याचा निर्णय



अमरावती विभागाचे आयुक्त यांच्या निर्देशानुसार झरीजामनी तालुक्यातील शाळा व महाविद्यालयांमधील ११ वीच्या विद्यार्थ्यांना दिनांक २२ मे २०२५ रोजी त्यांच्या शाळेतच जात प्रमाणपत्र , उत्पन्न दाखला , रहिवासी दाखला ,अधिवास प्रमाणपत्र  व इतर आवश्यक प्रमाणपत्रे कॅम्प घेन्यात येणार आहेत.

तहसीलदार झरीजामनी यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना ही प्रमाणपत्रे सहज आणि वेळीच उपलब्ध व्हावीत यासाठी संबंधित शाळांमध्ये आपले सरकार सेंवा  केंद्र किंवा CSC केंद्रांमार्फत ही सेवा दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत जातीचा दाखला, रहिवासी दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, आधार कार्ड, शाळा टीसी.राशन कार्ड.तलाठी अहवाल.जन्म दाखला.अशा आवश्यक कागदपत्रांची प्रत तयार ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

योजना अंतर्गत झरीजामनी तालुक्यातील खालील शाळा/महाविद्यालयांमध्ये सेवा दिली जाणार आहे:


1. राजीव कनिष्ठ महाविद्यालय, पाटण– दिलीप आलगोटवार 

2. सूर्यतेज कनिष्ठ महाविद्यालय, झरीजामनी – अमोल मंचलवार 

3. आदर्श कनिष्ठ महाविद्यालय, मुकुटबन – मोहन पारशिवे 

4. मातोश्री पुनकाबाई कनिष्ठ महाविद्यालय, मुकुटबन – मोहन मल्लुरवार 

5. सूर्यतेज कनिष्ठ महाविद्यालय, मांडवी - विक्रांत कोतपेल्लीवार

6. शारदा विद्या निकेतन, शिबला – विक्रम  राठोड

7. बालाजी कनिष्ठ महाविद्यालय, माथार्जून– हर्षल अग्रवाल

8. राजीव महाविद्यालय, झरीजामनी – मनिषा चिंतकुटलवार


तहसीलदार झरीजामनी यांनी संबंधित सेतू केंद्र चालक व शाळांच्या मुख्याध्यापकांना दिलेल्या आदेशानुसार, ही प्रक्रिया नियोजनबद्ध व पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी विशेष दक्षता घेण्यात येणार आहे.a