मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मालेगाव:दि 02/05/2025 मालेगाव तालुक्यातील ना.ना.मुंदडा या विद्यालयामध्ये मुलांच्या शैक्षणिक व कौशल्य गुणांना वाव देण्याच्या हेतूने पार पडलेल्या "समर ड्रोन डायनॅमिक"या प्रशिक्षणामध्ये मेडशी येथील पवन विठ्ठल भागवत इयत्ता सहावा वर्ग तुकडी( ई) मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलाने आपला सहभाग नोंदवून व्यवस्थितरीत्या प्रशिक्षण पूर्ण करून चांगले गुण प्राप्त केले. तसेच इयत्ता वर्ग सहावा तुकडी ( ई) च्या द्वितीय सत्र परीक्षा मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केल्या बदल ना.ना मुंदडा विद्यालय मालेगाव यांच्या वतीने पवन विठ्ठल भागवत व आई-वडील याचा पुष्पगुच्छ, ट्रॉफी, व प्रमाणपत्र देऊन सत्कार.. करण्यात आले.
पवनच्या या यशाचे सगळीकडे कौतुक होत आहे.
*"शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे म्हटले जाते.शिक्षण हे सध्याच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा भाग बनलेला आहे. बालपणातच आपल्या मुलांमध्ये चागले संस्कार व शैक्षणिक गुण निर्माण करून मुलांना चांगले व उच्च प्रतीचे शिक्षण देणे हे. प्रत्येक आई-वडिलांचे कर्तव्य आहे.कारण शिक्षणानेच एक चांगला मनुष्य व चांगले भविष्य घडते,*
*"वाचल तर वाचल"*
Social Plugin