Ticker

6/recent/ticker-posts

मौजे आष्टी ग्रामपंचायत मध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार विरुद्ध;भगवान वाघमारे यांचा जिल्हा परिषद जालना कार्यालयासमोर उपोषणाचा आज पाचवा दिवस



ग्रामपंचायत मधील अनागोंदी कारभार आणि लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध उपोषण कर्ता भगवान रंगनाथ वाघमारे यांची तबियत खालावली जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी मणियार साहेब लक्ष देणार का?


अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ 

परतूर तालुक्यातील मौजे आष्टी ग्रामपंचायत चे  सरपंच आणि ग्रामसेवक यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून विकास निधीत गैरव्यवहार केला आणि अजूनही चालू आहे या गैरव्यवहाराबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार केलेला असून आतापर्यंत कुठलीही व कसल्याही प्रकारची चौकशी करण्यात आली नाही.गावाचा विकास व्हावा याकरीता शासनाकडून लाखो रुपयांचा निधी विविध घटका अंतर्गत पुरविल्या जातो ग्रामपंचायत आष्टी यांना शासनाच्या निधीतून १५ व्या वित्त आयोगामधून आलेला लाखो रुपयांचा निधी मात्र सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमताने अफरातफर करुन मोठ्या प्रमाणात अनियमितता करुन भ्रष्टाचार केला आहे.घरकुल योजने मध्ये काम न करता बिले उचलण्यात आले.एम.आर.जी.एस.ची कामे अर्धवट करुन संपूर्ण बिल (रक्कम) उचलली आहेत.ओबीसी घरकुल योजनेची घराचे कामे न करता सदरील लाभार्थ्यांकडून पैसे घेऊन घर न बांधता संपूर्ण बिल उचलण्यात आले आहे.

तसेच महात्मा ज्योतिबा फुले व्यापारी संकुलनाचे काम अर्धवट असून त्यामधून बिअर बार साठी रस्ता ठेवलेला आहे.तोही रस्ता कोणत्या आधारावर देण्यात आला आहे.रमाई घरकुल व ओबीसी घरकुल योजनेतील सावळा गोंधळ आणि एम.आर.जी.एस.मधील अहिल्यादेवी सिंचन विहीरीचे व पांदण रस्त्याचे बोगस रित्या थातूरमातूर कामे करण्यात आले.याबाबत वारंवार शासनाकडे चौकशी संदर्भात तक्रार करुनही अद्याप कसल्याही प्रकारची चौकशी होत नाही.१५ व्या वित्त आयोगातील निधीचा अफरातफर करुन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या भ्रष्टाचाराची जो पर्यंत उच्चस्तरीय चौकशी होत नाही तो पर्यंत कुठल्याही कामाचे बिल आदा करण्यात येऊ नये असे गटविकास अधिकारी यांना आदेशीत करावे. उच्चस्तरीय चौकशी करुन संबंधित कर्मचारी,सरपंच आणि ग्रामसेवक व इंजिनिअर या दोषींवर कठोर कारवाई करुन निलंबित करण्यात यावे न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरु राहील.