शिरुर ग्रामीण प्रतिनीधी – (शैलेश जाधव)
शिरुर शहरातील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या सुवर्णयुग मित्र मंडळ, हुडको वसाहत या प्रतिष्ठित संस्थेच्या क्रियाशील महिला सदस्या सौ. सुरेखा संतोष ससाणे यांची महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळाच्या शिरुर तालुका महिला शहराध्यक्षा पदी निवड झाल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. ही निवड महाराष्ट्र परीट सेवा मंडळ, पुणे च्या महिला अध्यक्षा सौ. संगिता ननवरे यांच्या हस्ते करण्यात आली. सौ. ससाणे यांना यावेळी नियुक्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
सामाजिक क्षेत्रातील आपल्या सक्रिय सहभागामुळे ओळख निर्माण करणाऱ्या सुरेखा ससाणे यांनी या नव्या जबाबदारीबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले, “सुवर्णयुग मित्र मंडळाच्या प्रेरणेतूनच मला समाजकार्याची दिशा मिळाली. परीट समाजासाठी ही नवी संधी लाभल्याने मी मनापासून ऋणी आहे. ही जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने पार पाडणार आहे.”
सौ. ससाणे यांच्या निवडीनंतर सुवर्णयुग मित्र मंडळाच्या सदस्यांनी जल्लोषात अभिनंदन करत त्यांचा सत्कार केला. त्याचबरोबर शिरुरमधील विविध संघटनांनी तसेच हुडको वसाहतीतील नागरिकांनी शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सामाजिक सेवा, संघटनात्मक कामगिरी आणि नेतृत्वगुणांनी सजलेली ही निवड संपूर्ण परीट समाजासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.





Social Plugin