Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा लाड समाजसेवेचा अनोखा उपक्रमः गाथा सोळंकेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रुग्णसेवेचा वसा



पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि 

कर्मजा समाजातील गरजू रुग्णांसाठी वैद्यकीय साहित्य पुरविणाऱ्या गंगा वैद्यकीय साहित्य सेवा बैंक या उपक्रमाला कारखेडा येथील आकाश सोळके आणि कारंजा येथील अंकुश देशमुख यांनी एका सुंदर सामाजिक उपक्रमातून मदत केली. आकाश सोळक यांच्या कन्या गाथा आकाश सोलंके हिया पाचवा वाढदिवस ४ मे २०२५ रोजी साजरा करण्यात येत आहे. हा वाढदिवस पारंपरिक पद्धतीने न साजरा करता, रुग्णांच्या मदतीसाठी फोल्डिंग पलंग, बहीलचेअर आणि वॉकर भेट देत समाजसेवेचा नवा आदर्श पालून दिला. सर्वधर्म मित्र मंडळ, कारंजा लाड या संस्थेच्या गंगा वैद्यकीय साहित्य सेवा बँकेला २५ वर्षापासून आरोग्य सेवेत कार्यरत असून, गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय साहित्य पुरविले जाते. आकाश सोळंके व त्यांच्या नातेवाईक अंकुश देशमुख यांनी गाथाचा वाढदिवस स्णमेवेसाठी साजरा करावा, असा निर्णय घेतला. या उपक्रमासाठी त्यांनी संस्थेला १५,००० स्पयांचा पनादेश प्रदान केला.

या निधीतून बालाजी फर्निचरचे संचालक पौरज बंग यांच्या सहकायनि एक फोल्डिंग पलंग, एक व्हीलचेअर आणि तीन वॉकर उपलब्ध करून देण्यात आले. यामुळे अनेक रुग्णांना त्यांच्या उपचारांदरम्यान सुलभता मिळणार आहे. गाथा आकाश सोळकला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। तिच्या वाढदिवसाचे हे सामाजिक स्वरूप भविष्यासाठी प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सर्वधर्म मित्र मंडळ आणि गंगा वैद्यकीय साहित्य सेवा बँकेचे कार्य भविष्यातही असाच सामाजिक सहभाग लाभावा, हीच सदिच्चाम