दुधगांव-निखिल नलवडे-
रविवार, दि.04 मे 2025 ते शनिवार, दि. 10 मे 2025 या कालावधित दुधगांव, सांगली येथे होत असुन मंगळवार दि. 06/05/2025 रोजी तीसऱ्या दिवशी सकाळी मंगलपाठ, यजमानांची मिरवणूक नित्यविधी, जन्मकल्याणक दृश्य,मंगलकुंभानयन मिरवणूक, पंचामृत भगवान अभिषेक,पाठशाळा ग्रुप सांस्कृतिक कार्यक्रम,धर्मसभा, व्याख्यान,प्रवचन, सवाल, पंडुकशीलेवर जलाभिषेक (मिरवणूक) भगवान नामकरण विधी (पाळणा महोत्सव) असे विविध कार्यक्रम दिवसभरात घेण्यात आले.
बुधवार दि. 07/05/2025 रोजी मौजीबंधन संस्कार, राज्याभिषेक,मिरवणूक तसेच पद्मावती ग्रुपचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. दररोज सकाळी व संध्याकाळी सवालाद्वारे 2 हत्ती, 5 घोड़े यावरुण गावातून मिरवणुक काढण्यात येते. संपूर्ण गावामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. दररोज सुमारे १० ते १५ हजार श्रावक-श्राविका महाप्रसादाचा लाभ घेत आहेत.
100 वर्षे पूर्ण झालेल्या श्री 1008 भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरचा हा तीसऱ्यादा जीर्णोद्धार होऊन 39 वर्षानंतर पंचकल्याणक होत आहे.यामुळे गावात व परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.प. पू.108 विद्यासागरजी महाराज , प्रशांतसागरजी, अविचलसागरजी, निर्लोभसागरजी, सुधर्मसागरजी, सुखसागरजी, अध्यात्मसागरजी आगमसागरजी,नेमिसागरजी प. पू. 108 निर्यापक श्रमण विद्यासागरजी महाराज, साधुसंघ यांच्या पावन निर्देशनात पूजेची तयारी झाली आहे. मागील 3 वर्षात मंदिर कमिटी, जीर्णोद्धार समिती व ग्रामस्थ यांनी देणगी व वर्गणीच्या माध्यमातून भव्य अशा मंदिराची निर्मिती केली आहे. याकामी मंदिर कमिटी, पूजा कमिटी, जीर्णोद्धार कमिटी समस्त श्रावक, श्राविका, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ, विविध संस्था, विविध मंडळ सर्व ग्रामस्थ यांनी तन, मन, धन अर्पण करुन सुंदर अशी मंदिर रचना केली आहे.
आजवर विविध मान्यवर विधान परिषद सदस्य इंद्रीस नायकवडी, चिपळूनचे आमदार निकम, आमदार जयंत पाटील, माजी खासदार संजय काका पाटील यांनी भेटुन शुभेच्छा दिल्या.प्रसन्नसागरजी व विद्यासागरजी महाराज यांचे मंगल प्रवचन झाले.
Social Plugin