Ticker

6/recent/ticker-posts

खेर्डा-काजळेश्वर रस्त्या दुरुस्ती ची मागणी ---- डॉ. हर्षल पवार



गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी

कारंजा तालुका मधील गाव खेर्डा ते काजळेश्वर रस्त्यावर खड्डे पडले असून कारंजा तालुक्यातील नागरिकांना दररोज येतो आहे. खेर्डा ते काजळेश्वर या सात किलोमीटरच्या रस्त्यावरून चालणे म्हणजे जणू मृत्युच्या सावलीतून वाट काढणे. हा रस्ता आहे की खड्ड्यांची माळ - हेच ओळखणे कठीण झाले आहे.

दररोज शाळेला जाणारे विद्यार्थी, हॉस्पिटलमध्ये जाणारे रुग्ण, शेतमजुरी करणारे शेतकरी आणि आपल्या कामासाठी बाहेर पडणारे सामान्य नागरिक - सगळ्यांनाच या रस्त्यामुळे जीव मुठीत धरावा लागत आहे. दुचाकी, ऑटो, ट्रॅक्टरवरून प्रवास करताना अपघाताची भीती सतत छायेसारखी सोबत करते."रस्ता खड्ड्यात आहे खड्डा रस्त्यात?" की या प्रश्नावरूनच या मार्गाची अवस्था किती भयावह आहे, हे सहज समजते. इतका वाईट रस्ता की, डॉ हर्षल पवार या सामाजिक कार्यकर्त्यांनी याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. तो पाहताना असा भास होतो की एखाद्या पांदन वाटेवरून एखादं जनावरही चालावं का, असा प्रश्न पडावा. प्रशासन मात्र अद्यापही झोपेचे सोंग घेत आहे. अपघात होईपर्यंत, जीव गमवावा लागेपर्यंत, कदाचित एखादा मोर्चा रस्त्यावर उतरवावा लागेपर्यंत कोणीच हलत नाही. हे दुर्लक्ष भविष्यात अधिक गंभीर परिणाम देऊ शकते.

हा रस्ता त्वरित डांबरीकरण करून नागरिकांना दिलासा द्यावा. अन्यथा संतप्त जनता रस्त्यावर उतरेल असे आव्हान डॉक्टर हर्षल पवार यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे