प्रतिनिधी @समाधान भुतेकर ईसरूळ
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील ईसरूळ (मंगरूळफाटा) येथे चालू असलेल्या संत चोखोबाराय पुण्यतिथी सोहळ्यात. परमपूज्य निलेश महाराज झरेकर यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वआयोध्या श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंद गिरीराज महाराज यांच्या हस्ते गीता परिवारातर्फे आयोजित कार्यक्रमात स्वामी विवेकानंद पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. झरेकर महाराज यांनी 47 हजार कैद्यांना भगवद्गीतेच्या माध्यमातून वाम मार्गात गेलेल्या कैद्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य केल्याने हा पुरस्कार दिला गेला.
यावेळी शिंदे म्हणाले की राजकारणापेक्षा अध्यात्म उंच व श्रेष्ठ आसून मी सुद्धा एक वारकरी कुटुंबातील शेतकरी कुटुंबतील लाडक्या बहिनीचा लाडका भाऊ आहे लाडक्या बहिणीसाठी सुरू केलेली योजना कधी आमचे सरकार बंद करणार नाही दिलेला शब्द आम्ही पूर्ण करतो असेही ते म्हणाले. पहलगाम हमल्याचे चोख प्रतिउत्तर भारतीय जवानांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिले. त्यामुळे भारतीय जवानांचे सुद्धा त्यांनी तोंड भरून कौतुक केले. पुढे बोलताना ते म्हणाले की आमची कामे आम्ही टीम म्हणून पाहत असतो समाजाचा प्रत्येक घटकासाठी आम्ही काम करत असतो व करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आपल्या सर्वांचे आशीर्वाद जोपर्यंत आमच्या सोबत आहेत तोपर्यंत काम करत राहणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी आयोजित धार्मिक व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आमदार संजय गायकवाड आमदार श्वेता ताई महाले माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर डॉक्टर संजय रायमुलकर संजय मालपाणी शिंदे सेना जिल्हाप्रमुख बळीराम मापारी युवा सेनेचे ऋषिकेश जाधव महिला आघाडी जिल्हाप्रमुख मायाताई मस्के हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील हरिभक्त परायण पाटणकर बाबा ईसरूळ गावचे सरपंच सतीश पाटील भुतेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
Social Plugin