तालुका प्रतिनिधी मारोती गाडगे/गेवराई
गेवराई शहरातील नामांकित अशा आर्ट ऑफ फन अकॅडमी च्या वतीने घेण्यात येत असलेल्या उन्हाळी "डान्स व ॲक्टिंग" शिबिराचे ज्येष्ठ कलावंतांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले .
गेवराई शहरात गेल्या चार वर्षापासून बाल कलावंतांचे सुप्त गुण तथा त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविण्यासाठी कार्यरत असणाऱ्या आर्ट ऑफ फन अकॅडमीच्या वतीने १०दिवसीय डान्स & ॲक्टिंग शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे माजी सदस्य ज्येष्ठ रंगकर्मी तथा गेवराई रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र बरकसे , महाराष्ट्र शासनाचा लोककलावंत अनुदान समितीचे माजी सदस्य शाहीर विलास बापू सोनवणे , पत्रकार ॲड . शेख हारून , पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष जुनेद बागवान पालक, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पत्रकार भवन येथे पार पडला. बाल चिमुकल्या बालकांना मार्गदर्शन करताना प्रा बरकसे म्हणाले की , पालकांनी मुलांना व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी मोबाईल बाजूला सारून शिबिराला पाठवले त्याबद्दल पालकांना धन्यवाद देत आपल्या विकासात मोबाईल मुळे अडथळा येत आहे . मोबाईलमुळे मुलांमधील संवाद हरवत चालला आहे . मुले एककेंद्री होत आहेत . शिबिरात मन लावून शिका त्याचा भावी जीवनात नक्की फायदा होईल असे ते म्हणाले . शाहीर विलास सोनवणे, पत्रकार जुनेद बागवान यांनी शिबिरार्थ्यांना शुभेच्छा दिल्या .
या शिबिरात दहा दिवस सिने अभिनेते, दिग्दर्शक गणेश देशमुख , अभिनेते, सुधीर निकम , अभिनेते अशोक कानगुडे , नृत्यांगना वैभवी टाकणखार अश्या विविध कलावंतांचे मार्गदर्शन लाभणार आहे. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी आर्ट ऑफ फन अकॅडमी चे संचालक रोहित पुराणिक, दिपक गिरी, शिवकुमार सोनवणे, विवेक शर्मा हे परिश्रम घेत आहेत. शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे .
Social Plugin