गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
तालुक्यातील काजळेश्वर परीसरातील जानोरी; काजळेश्वर व पानगव्हाण येथे आलेल्या चक्रीवादळामुळे दिनांक २० मे रोजी संत्रा आंबा फळ पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्राप्त माहितीनुसार कारंजा तालुक्यातील जानोरी भिंगारे, पानगव्हाण तसेच काजळेश्वर येथे दि.२० मे रोजी संध्याकाळी सुसाट चक्रीवादळ सदृष्य वाऱ्यासह प्रचंड ढग दाटून आले व विजेच्या कडकडाटासह तुफान पाऊस झाला. चक्रीवादळ सदृष्य सुसाट वाऱ्या मुळे संत्याच्या बागांवर वाईट परिणाम झाला असून अनेक झाडं मुळासकट उध्वस्त झाली आहेत. काही झाडं वीजेच्या तारांवर कोसळली, रस्ते उन्मळून पडलेल्या झाडांनी अडवले गेले, तर कुणाचे आंब्याचे झाड मोडून खाली पडले. यामधे शेतकऱ्यांचे फळ पीकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या संकटसमयी शासनाने नुकसानग्रस्तांचे तात्काळ पंचनामे करून योग्य ती मदत द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे वतीने अविनाश भिंगारे यांनी केली आहे.
यावेळी वादळीवाऱ्यामुळे पानगव्हाण येथील शेतकरी शुभम अनंत सुपनर यांचे संत्रबागेतील संत्राचे झाडे उन्मळून पडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकरी शुभम सुपनर यांनी आपल्या पानगव्हाण शिवारातील सर्वे नंबर ३० मध्ये एक हेक्टर क्षेत्रात संत्रा, मोसंबी, निंबू, आंबे व अंजीराची लागवड केली. अशातच संत्रा झाडे ५ वर्षाची झाली असताना मंगळवारी रात्री वादळी वाऱ्यामुळे त्यातील संत्राची काही झाडे उन्मळून पडली. त्यामुळे त्यांचे जवळपास ५० हजाराचे नुकसान झाले. काजळेश्वरातही काहींच्या घरावरील टिनपत्रे उडून गेल्याने घराला क्षती पोहचली तर सिमेंट खांब ही पडल्याने विस्कळीतपणा आला तेव्हा महसूल विभागाने नुकसानग्रस्त झाडाचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी शुभम सुपनर अवीनाश भिंगारे यांनी केली आहे.





Social Plugin