Ticker

6/recent/ticker-posts

गेवराईत रोटरी क्लबची स्थापना अध्यक्षपदी प्रा. राजेंद्र बरकसे तर सचिवपदी प्रवीण जैन यांची निवड .



तालुका प्रतिनिधी मारोती गाडगे, गेवराई 

    गेवराई (बीड):-दि २९/मंगळवार जिल्ह्यातील अनेक तालुक्यात आंतरराष्ट्रीय संस्था  रोटरी क्लबचे जाळे पसरलेले असताना  गेवराईत मात्र क्लब स्थापन होत नव्हता . परंतु काही तरुणांनी एकत्र येत रोटरी क्लब स्थापन करण्याचा निर्णय घेतला . त्यानुसार बुधवार दि . २३ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी रोटरी क्लब ऑफ गेवराई ची स्थापना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येऊन अध्यक्षपदी प्रा. राजेंद्र बरकसे , तर सचिवपदी प्रवीण जैन यांची निवड करण्यात आली . गेवराई येथील सिंधी भवनमध्ये बुधवार दि . २३ एप्रिल २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस  छत्रपती संभाजीनगर येथील रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट डायरेक्टर (मेंबरशिप )अमित वैद्य, सुनील बागुल,रोटरी क्लब बीड मिडटाउनचे अध्यक्ष नितीन गोपन,सूर्यकांत महाजन, राहुल कुलकर्णी सुरेश बुद्धदेव, दिनेश लोळगे, अनुराग जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीस पहेलगाम येथील भारतीय नागरिकांवर झालेल्या आतंकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना काही क्षण स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. बैठकीस सुरुवात झाल्यानंतर अमित वैद्य यांनी रोटरी क्लब   सामाजिक कार्य करण्यासाठी एक पर्वणी असल्याचे स्पष्ट केले. यावेळी उपस्थित रोटरीयन्स यांच्यात एकमत होऊन प्रा. राजेंद्र      बरकसे यांची रोटरी क्लब ऑफ गेवराई च्या अध्यक्षपदी तर प्रवीण जैन यांची सचिवपदी निवड करण्यात आली.

 त्याचबरोबर कोषाध्यक्ष म्हणून बाळासाहेब बर्गे यांची तर  फौंडर डिस्ट्रिक्ट डायरेक्टर म्हणून डॉ. विजय सिकची, मेंबरशिप डेव्हलपमेंट डायरेक्टर म्हणून श्यामकाका येवले यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रोटरी क्लब गेवराईच्या या बैठकीस उत्तमराव सोनवणे, डॉ . मुरलीधर मोटे, सीए रविंद्र गिरी, मनोज टाक,   सुरेंद्र रुकर, राजेंद्र डेंगे,प्रा. रामलिंग गुळवे ,डॉ. रामदास दातार ,   प्रशांत घोटणकर ,शरद खरात , प्रा . डॉ .नागनाथ मोटे  धर्मराज करपे, जयराज कौरानी, डॉ . अभिनव मुळे, मनोज टाक, गणेश  कुलकर्णी, सुनील काळे, संदीप मडके, सुदामराव धुपे, उमेश बजाज, महेश मोटे, डॉ. रामदास दातार ,डॉ . किशन देशमुख  यांच्यासह माऊली बेदरे, गोविंद मुंदडा,सखाराम कानगुडे, एस. पी. सूर्यवंशी ,सतीश पल्लेवाड ,ॲड योगेश पाटील, अर्जुन माने, डॉ . गुलाब गाडे , अमित शिखरे  दीपक पुरी,नितीन कुलथे ,विजय धुरंधरे यांची उपस्थिती होती .