Ticker

6/recent/ticker-posts

दुधगांव येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी



वार्ताहर-निखिल नलवडे

दुधगांव- ता.मिरज- दुधगांव मध्ये अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवजयंती महोत्सव समिती आयोजित सार्वजनिक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी. सकाळी पन्हाळगडाहून ज्योत आणण्यात आली व गावातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन लोकनियुक्त सरपंच सौ.करिश्मा पाखरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच माजी सरपंच विकास कदम यांचे हस्ते श्रीपळ वाढविण्यात आले. त्याच बरोबर कर्मवीर अण्णाच्या पुतळ्यास उपसरपंच गिरीश पाटील यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सगळीकडे जय भवानी जय शिवाजी च्या घोषणा सुरू होत्या.

शिवजयंती समिती ने सायंकाळी भव्य दिव्य मिरवणूक आयोजित केली मिरवणुकीमध्ये डीजे, आतिषबाजी, हलगी, घोडे, उंट, रथ यांचा समावेश होता. यामुळे संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते. मिरवणूक ऐतिहासिक पद्धतीने मोठ्या उत्साहात पार पाडली. या शिवजयंती चे वेशिष्ट्य म्हणजे गावातील सर्व जाती धर्मांचे लोक या सोहळ्यास उपस्थित होते. यावेळी, माजी लोकनियुक्त सरपंच विकास कदम,विक्रम कदम, विलास आवटी, उमेश आवटी,ग्रामपंचायत सदस्य सतीश सांद्रे,अविनाश भोसले,दिनेश धनवडे,माणिक कुंभार, म्हेत्रे,विक्रम कदम, तात्यासो भोसले, मेजर नलवडे,मेजर कन्हेया शिंदे ,मेजर अजित कदम,बबन माने, तात्या माळी, संदीप पाटील, पोलीस पाटील, संभाजी गावडे,दादा बेपारी, संदीप आडमुठे, संयोजन समिती तसेच गावातील सर्व तरुण मंडळे, पत्रकार, सर्व शिवभक्त उपस्थित होते.