Ticker

6/recent/ticker-posts

"वाकेश्वर येथे "पशुधन उपजीविका विकास, प्रशिक्षण संपन्न



बुध  दि [प्रकाश राजेघाटगे ]

 अफार्म पुणे, उमेद पंचायत समिती खटाव, ग्रामपरिवर्तन संस्था कटगुणचे वतीने वाकेश्वर येथील महिलांचा पशुधन, गावठी कोंबडी पालन मधून उपजीविका वाढ, बाबतीत ग्रामसंघचे महिलांना प्रसिद्ध गावठी कोंबडी व्यवसायिक तेजस अभंग यांनी विशेष मार्गदर्शन, व्यवसाय, व्यवस्थापन, मार्केटींग बाबतीत मार्गदर्शन व प्रत्यक्ष कोंबडी गट पुरवणे बाबतीत मार्गदर्शन केले .                                              

तसेच सध्या देशी कोंबडी पालन व्यवसाय अनुभव कथन, व्यवसाय फायदा याबद्दल उमेदच्या सि, आर. पी, सौ प्रियांका फडतरे, कृषी सखी सौ, पूजा फडतरे यांनी उपजीविका वाढ कशी होऊ शकते याची दिशा दिली. कृषी जोड व्यवसाय गावठी कोंबडी पालन व्यवसाय चांगला असल्याचे मत सरपंच सौ ताराबाई राऊत, सौ, विमल राऊत, सौ सीता फडतरे यांनी व्यक्त करून जून पासून गावठी कुकूट पालन व्यवसाय करण्याचे महिलांनी नियोजन केले आहे.                             

 या बरोबरच या प्रशिक्षण मध्ये परस बागेतील कुकूट पालन, तसेच सेंद्रिय पालेभाज्या उपजीविका वाढ व आरोग्य बाबतीत  प्रताप गोरे यांनी नियोजन दिले . या नुसार तीस कुटुंबे आरोग्य दाई पालेभाज्या परसबाग करण्याचे नियोजन केले . या उपक्रमसाठी अफार्मच्या प्रकल्प संचालिका वैशाली ताई गंवडी यांनी मार्गदर्शन, साह्य केले. भविष्य काळात सेंद्रिय शेती व पशुधन आधारित उपजीविका वाढ करण्याचा निर्धार महिलांनी केला.