Ticker

6/recent/ticker-posts

शिवलिंग स्थापना कलशारोहण सोहळ्यात मुस्लिम कुटुंबाकडून अन्नदान.



 बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.                                                                                   

    बिलोली तालुक्यातील मौजे अटकळी येथे शिवलिंग स्थापना कलेषारोहन शिवपुराणकथा व अखंड शिवनाम सप्ताह 2 मे ला सुरुवात झाली. गावातील अनेक शिवभक्तांनी अन्नदान सारखे पवित्र काम करत आहे. यातच गावातील मुस्लिम समाजातील किसान जेट किंग चे मालक सय्यद अहमद पटेल कुटुंबाने सप्ताहाच्या दिवशी गावातील लोकांना अन्नदानाचे पवित्र काम केले आहे. प्रथमच महादेव मंदिराचे नवीन बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मंदिरात शिवलिंग स्थापना कलशारोहण शिवपुरानकथा व अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. आहे दररोज महापुराणकार श्री ज्ञानेश्वर महाराज थोरात  जालनेकर आहेत. रसाळ वाणीतून संगीतमय महापुरान कथेचे आयोजन करण्यात आले आहे.

 दररोज वेगवेगळ्या शिवभक्त पारायणकरांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अनेक गावातील शिवभक्तांनी येत आहेत त्यातच गावातील मुस्लिम समाजातील सय्यद खय्युम पटेल कुटुंबाने सप्ताहाच्या  निमित्ताने हिंदू बांधवांसाठी अन्नदान करून गावात सामाजिक सलोखा निर्माण करणारे पवित्र काम केले त्यामुळे गावातील हिंदू बांधवांनी सय्यद खय्युम पटेल यांचे मोठे बंधू सय्यद आयुब पटेल यांचा शिवपुरान कथाकार यांच्या हस्ते सत्कार शिवनाम सप्ताहाच्या ठिकाणी करण्यात आला. सय्यद खय्युम यांच्या कृतीतून सामाजिक ऋणानुबंध जपत एक आदर्श निर्माण केला आहे.