Ticker

6/recent/ticker-posts

नागरिकांना दक्ष राहण्याचे पोलिसांकडून आवाहन



उन्हाळ्याच्या सुटीत बाहेरगावी जाताय? बंद घरांची घ्या खबरदारी

 बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे]

उन्हाळ्यात शाळांना सुट्या लागल्यानंतर नागरिक बाहेरगावी, लांबच्या सहलिला जातात. परंतु, जाताना घराच्या सुरक्षिततेच्या बाबतीत काळजी घेत नाहीत. घर बंद असल्याने रात्री किंवा दिवसा चोरटे हात साफ करून निघून जातात. सहलीवरून घरी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे लक्षात येते. आता उन्हाळा सुरू झाल्यानंतर घर फोडून चोऱ्यांचे प्रकार सुरू समोर येऊ शकतात. त्यामुळे घरे फोडून किमती वस्तू चोरीला जाऊ नयेत म्हणून पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण  यांच्याकडून काही खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

संध्याकाळी व सकाळी वॉकिंगसाठी जात असताना महिलांनी अंगावर किंमती दागीने घालुन जावु नये. सकाळी मॉर्निंगवॉकला जातेवेळी घरातील व्यक्तीला आतुन दरवाज्याला कडी लावण्यास सांगुन व तशी खात्री करून वॉकींगला जावे. मॉर्निंग वॉकसाठी वयस्कर पुरुष व महिला यांनी एकटयाने जावु नये. समूहाने मॉर्निंग वॉक करावे, अशा सूचना पोलिसांकडून यावेळी देण्यात आल्या आहेत.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असुन बहुतांश लोक हे घराचे गच्चीवर, घराबाहेर व दरवाजा उघडे ठेवुन झोपतात त्यामुळे चोरटे या संधीचा फायदा घेवुन घरात प्रवेश करून घरातील किमती वस्तु, दागीने व रोख रकमेची चोरी करतात. त्यामुळे नागरीकांनी सतर्क राहुन झोपताना घरातील सर्व दरवाजे आतुन व्यवस्थित लॉक करून घेवुन झोपावे. शक्य असल्यास दरवाजास चैनल गेट लावावे. रात्री घरात झोपत असताना ज्या खोलीमध्ये किंमती सामान आहे त्या खोलीमध्ये एखादी व्यक्ती झोपणे अवश्यक आहे. घरामध्ये खिडकीजवळ कपडे वगैरे उदा. पैन्ट, शर्ट अडकावु नयेव त्यामध्ये पैसे अगर किमती वस्तु वगैरे ठेवु नये. मोबाईल फोन खिडकीजवळ चॉर्निंगसाठी लावु नये, आपला मोबाईल आपण गर्दीमध्ये फिरत असताना वरच्या खिश्यात ठेवु नये. अशा सूचना पोलिसांकडून यावेळी करण्यात आले.

वयस्कर पुरुषांना किंवा महिलांना बँकेतुन पैसे काढण्यासाठी पाठवुनये. बँकेतुन पैसे काङल्यानंतर अनोळखी व्यक्तीकडे पैसे मोजण्यास देवु नये. पैसे बँकेतुन काढल्यानंतर प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये किंवा मोटार सायकलच्या डिगीमध्ये ठेवु नये. पोलीस असल्याची बतावणी करून खिशात दागिने ठेवा म्हणून चोरेट फसवणुक करून दागिन्याची चोरी करता अशावेळी जवळ पासचे लोकांची मदत घ्यावी व पोलीसांना ११२ वर संपर्क साधुन माहीती दयावी. मोबाईलवरून कोणासही आपले बैंक खाते नंबर अथवा एटीएम नंबर, ओटीपी नंबर किंवा बँक खात्या संदर्भात कोणतीही माहिती सांगू नये. त्याबाबत बैंक आपल्याला कोणतीही माहिती विचारत नाही.

महिलांनी घरी असताना कोणताही फेरीवाला सामान विक्री करण्यासाठी सेल्स मेन आल्यानंतर घरात प्रवेश देवू नये. सोने किंवा भांडे उजळवून देतो असे म्हणणारे लोकांपासुन सावधानता बाळगावी तसेच त्याबाबत पोलीस स्टेशनला कळवावे. गल्लीत अनोळखी महिला किंवा मुले / पुरुष फिरत असतील तर पोलीस ठाणेस तात्काळ कळवावे. दारावर विक्री करण्यासाठी आलेल्या लोकांबाबत सावधानता काही संशय आल्यास त्याचा मोबाईलमध्ये फोटो काढुन ठेवावे व त्याबाबत पोलीस स्टेशला फोन करून माहिती दयावी. असे आवाहन पुसेगाव पोलीस स्थानक मार्फत करण्यात आले आहे.पुसेगाव शहरात व आपले गावामध्ये काही अनोळखी व्यक्ती किंवा महिला विनराकरण फिरत असल्यास किंवा काही आक्षेपार्ह आढळुन आल्यास तात्काळ पोलीस स्टेशन पुसेगाव येथे कळवावे.                    

- वाहनांचीही काळजी घ्या    - घरात किमती सामान ठेवू नका, बँकेतील लॉकरचा वापर करावा. महिलांनी बाहेरगावी जात असताना अंगावरील दागिने सुरक्षित आहेत का याची खात्री करावी व दागिने   पर्समध्ये किंवा बॅगमध्ये ठेवल्यास पर्स व बॅग सोबत ठेवावी. बस मध्ये चडत असताना मौल्यवान वास्तूची काळजी घ्यावी. तसेच गावी जाताना घराकडे लक्ष ठेवण्याबाबत शेजाऱ्यांना सांगा, घरच्या चारी बाजूस सीसीटेव्ही लावावीत. सहलीला गेल्यानंतर दुचाकी वाहने, कार घरासमोर, इमारतीच्या पार्किंगमध्ये लावल्या जातात. त्या काळात चोरटे ही वाहने चोरून नेतात. त्यामुळे ही वाहने व्यवस्थित लॉक करून ठेवली पाहिजे.