Ticker

6/recent/ticker-posts

पालघर तालुक्यातील रामबाग सबस्टेशन 33 kva वीजपुरवठा वारंवार खंडित



पालघर (ज्ञानेश चौधरी) ग्रामीण प्रतिनिधी

पालघर तालुक्यातील रामबाग सबस्टेशन चा 33 kva सप्लाय वारंवार खंडित होत असून गेले  दोन दिवसापूर्वी केबल जळाल्यामुळे 18 ते 22 तास वीजपुरवठा खंडित झाला होता  आज दिनांक ५ जून रोजी पुनः 33kva वीजपुरवठा केबल जळाल्यामुळे खंडित झाला आहे.

पावसाळा चालू होण्याअगोदर सतत 2/3तासाने लाईट जात असल्यामुळे रामबाग सबस्टेशन वर अवलंबून असलेल्या 40/50 गावातील जनतेला त्रास सहन करावा लागत आहेत.सर्व गावातील जनता ह्या वर महावितरण ने काही मार्ग लवकरात लवकर काढला नाही तर आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.ह्या विषयावर लोकप्रतिनिधी ही मूग गिळून बसले आहेत कारखानदार आणि आईसक्रीम विक्रेता हवालदिल झाला आहे.