Ticker

6/recent/ticker-posts

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत लाभार्थी मेळावा व महा आवास अभियान पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित राहण्याचे अहवान



मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले

मालेगाव :दि 3 रोजी मा. केंद्रिय मंत्री, ग्रामीण विकास, कृषि व किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या शुभहस्ते व मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे प्रमुख उपस्थित प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण लाभार्थी मेळावा व महाआवास अभियान पुरस्कार वितरण कार्यक्रम दिनांक ०३/०६/२०२५ रोजी ४.०० बालेवाडी पुणे येथे होणार आहे. सदर कार्यक्रमाला online प.स. स्तरावरून उपस्थित राहावे.

त्याचप्रमाणे २०२४-२५ मध्ये मंजुर झालेल्या लाभार्थ्यांना आवास मित्र अॅपचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे व e kyc न केलेल्या लाभाध्याना करिता e-kyc कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. या करीता प्रत्येक ग्रामपंचायत मधील जास्तीत जास्त काम सुरु न केलेली व e-kyc बाकी असलेल्या लाभार्थीनी रमाई सभागृह पंचायत समिती मालेगांव येथे दिनांक ०३/०६/२०२५ रोजी १.०० वाजता उपस्थित राहण्याचे अहवान

गट विकास अधिकारी मालेगाव पंचायत समिती यांच्या कडून करण्यात आली आहे