Ticker

6/recent/ticker-posts

दोन गावांनी ओलांडला 500 जलताराचा टप्पा



कारंजा तालुक्यातील गावाचा समावेश, १६ जणांना कॉफी विथ कलेक्टरचा मान

पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि 

कारंजा(लाड ) भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई आणि दुष्काळावर मात करण्याकरिता शासन प्रशासनाच्या वतीने जलतारा योजना राबविण्यात येत असून ज्या गावांनी ५०० जलतारा पूर्ण केले अशा गावातील पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांसोबत कॉफी विथ कलेक्टर या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार असल्याची घोषणा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली होती त्यानुसार कारंजा तालुक्यातील दोन गावांनी ५०० जलकाराचा टप्पा ओलांडल्याने त्या गावातील पदाधिकाऱ्यांना कॉफी विथ कलेक्टर या कार्यक्रमात सहभागी होण्याचा मान मिळाला यात तालुक्यातील लाडेगाव आणि गायवळ या दोन गावातील जलतरासाठी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

हा कार्यक्रम २६ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भावनात पार पडला. या उपक्रमांतर्गत ५०० किंवा त्याहून अधिक जलतारे पूर्ण करणारे सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पोलिस पाटील, ग्राम रोजगार सेवक आणि वॉटर हिरोज यांचा जिल्हाधिकारी व उपस्थित

मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जलतारा अभियान हे केवळ जलसंधारणाच नव्हे, तर ग्रामीण समाजाच्या सहभागातून घडणाऱ्या शाश्वत विकासाचं उदाहरण असल्याचे मत यावेळी बोलताना जिल्हाधिकारी भुवनेश्वर यांनी व्यक्त केले. ५०० जलतारे पूर्ण करण ही केवळ संख्या नसून, गावकऱ्यांची एकजूट, श्रमप्रतिष्ठा आणि पर्यावरणाप्रतीची बांधिलकी याचं प्रतीक असल्याचे त्यांनी पुढे बोलताना सांगितले. या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, जिल्हा कृषी अधिकारी आरिफ शहा, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके, आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक बालरोग तज्ज्ञ डॉ. हरीष बाहेती, कारंजा येथील पवन मिश्रा व श्याम सवाई यांची उपस्थिती होती. हा उपक्रम जलसंपत्तीच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरला असून, अशा कार्यक्रमांमुळे गावपातळीवर काम करणाऱ्या जलदूतांना आवश्यक तेवढं प्रोत्साहन लाभत असल्याचा सुरूया कार्यक्रमाच्या माध्यमातून उमटला. तर या उपक्रमामुळे काम करणाऱ्यांना बळ मिळाल्याच्या प्रतिक्रिया उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आले