Ticker

6/recent/ticker-posts

अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या जालना जिल्हाध्यक्ष पदी डॉ.रमेश तारगे यांची निवड



अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ

अखिल भारतीय ग्राहक पंचायतची नवीन जिल्हा कार्यकारिणी दिनांक 26 मे रोजी जालना येथील विश्राम गृहात पार पडली असून ही नवीन कार्यकारिणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे मराठवाडा प्रांत अध्यक्ष विलासजी मोरे यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आली असून जुन्या कार्यकारिणीतील जिल्हासचिव पदावर असलेले डॉ. रमेश तारगे यांची त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन एकमताने त्यांची जिल्हाध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली.तसेच माजी जिल्हाध्यक्ष बालाप्रसाद जेथलिया यांची जिल्हासंघटनमंत्री म्हणून तर उपाध्यक्ष धर्मा खापरे,सहसंघटन मंत्री सुरेंद्र पोतदार, सचिव राहुल काळे,कोषाध्यक्ष लक्ष्मी नारायण मानधनी,जिल्हा कार्यालय प्रमुख राजेश लहामगे, विधी आयाम मधुकर सोनूने,सह विधी आयाम शेख वसीम,महिला सदस्य शेख सलमा,सल्लागार म्हणून डी.पी.पाटील गोळेगावकर,पर्यावरण प्रमुख देवानंद चित्राल,रोजगार प्रमुख हनुमान भगत तर सदस्य म्हणून बाबासाहेब हेमके,बन्सी पवार,हरिभाऊ कदम, रमेश गुंजाळ,अदी पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या.

यावेळी जालना जिल्ह्यात अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केल्यानंतर तालुका स्तरीय लोकशाही दिन,ज्ञानराधा मल्टीस्टेट बैकेचा घोटाळा यासह सर्व सामान्य ग्राहकाचे प्रश्न त्यामध्ये शेतकरी आत्महत्या अनुदान.जातीचे प्रमाणपत्र यासारखी असंख्य कामे मार्गी लागले त्या धरतीवर इतर जिल्ह्यात काम सुरु झाले त्यामुळे जालना ‌जिल्याचे काम कौतुकास्पद असल्याचे मत देवगीरी प्रांत प्रमुख डॉ विलास मोरे यांनी बैठकीत माडंले यावेळी जिल्हा कार्यकारिणी ची निवड करुन जालना जिल्हा अध्यक्ष पदी ग्राहक संरक्षण परिषद चे अशासकीय सदस्य डॉ रमेश तारगे यांची जालना जिल्हा अध्यक्ष पदी निवड केल्याची बैठकीत घोषणा केली.यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे घनसावंगी तालुकाध्यक्ष मारोती सावंत,गणेश गोरे,हरी गावडे,मनेश हेमके यांची उपस्थिती होती.