तालुका प्रतिनिधी मारोती गाडगे
गेवराई (बीड):- दि ०३/०७गढी येथे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय येथे नवीन प्राचार्य म्हणून २ जून रोजी विजयकुमार शिवाजीराव भोस यांनी पदभार स्वीकारला आहे . विजयकुमार भोस यांनी प्रभारी प्राचार्य श्रीमती एस. . मुन्नरवार यांच्याकडून प्राचार्यपदाचा भार स्वीकारला . विजयकुमार भोस हे मूळचे अहिल्यानगर येथील रहिवासी असून त्यांनी गढी येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षक म्हणून सेवा दिलेली आहे . त्यांनी यापूर्वी तुळजापूर (धाराशिव) आणि अमरेली (गुजरात ) येथेही प्राचार्य म्हणून सेवा केलेली आहे .
यापूर्वी २००७ मध्ये जवाहर नवोदय विद्यालय समितीकडून विजयकुमार बोस यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे . त्यांनी विद्यार्थ्यांचे स्वास्थ्य संवर्धनासह विविध प्रकारची फळे मिळावीत यासाठी आजवर विभिन्न नवोदय विद्यालयात 20 हजारपेक्षा जास्त फळझाडांची लागवड करून त्याचे संवर्धन केले आहे . आनंदी शिक्षण व कौशल्य प्रशिक्षणावर त्यांनी आजवर भर दिलेला आहे .बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गढी येथील पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयातसुद्धा नवीन शैक्षणिक धोरण राबविण्याचा त्यांचा मानस आहे . त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .





Social Plugin