शिरूर ग्रामीण प्रतिनीधी - (शैलेश जाधव)
शिरूर तालुक्यात सध्या तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या कामगिरीबद्दल नागरिकांमध्ये समाधानाची भावना आहे. मात्र दुसरीकडे काही ठराविक व्यक्ती आणि राजकीय गट त्यांच्याविरोधात द्वेषाने मोहीम राबवत आहेत. याच पार्श्वभूमीवर भूमीपुत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. सुशांत कुटे यांनी थेट पुढाकार घेत, तहसीलदारांच्या समर्थनार्थ ठाम भूमिका मांडली आहे.
"निष्कलंक अधिकारी असताना बदलीचा डाव आखणं हा लोकशाहीचा अपमान आहे," असं सुशांत कुटे यांनी स्पष्टपणे सांगितलं. ते पुढे म्हणाले, "शिरूरसारख्या तहसीलमध्ये अनेक वर्षे अकार्यक्षमता, एजंटगिरी आणि भ्रष्ट्राचाराचे साम्राज्य होतं. मात्र श्री. म्हस्के यांनी पूर्णवेळ हजर राहून, नागरिकांच्या समस्या वेळेवर मार्गी लावून एक नवीन पायंडा पाडला आहे. एजंटगिरी बंद झाल्याने काही लोक अस्वस्थ झाले आहेत आणि आता त्यांच्यावरच दबाव टाकण्याचा कट रचत आहेत."
"प्रामाणिक अधिकाऱ्याला लक्ष्य करणं योग्य नाही," अशी ठाम भूमिका घेऊन कुटे यांनी सांगितले की, तहसीलदारांना जाणूनबुजून बदनाम करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांतूनही होत आहे.
"चांगल्या अधिकाऱ्याचं कौतुक करावं लागतं, द्वेषाने बदनामी करणं हा अन्याय आहे,"
अशा शब्दांत सुशांत कुटे यांनी जनतेसाठी लढणाऱ्या प्रशासनिक अधिकाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं आवाहन केलं आहे.





Social Plugin