Ticker

6/recent/ticker-posts

मालेगाव बसस्थानक येथे एसटी बसची पूजा करून ७७ वा वर्धापन दिवस साजरी



मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले

मालेगाव, ०१ : येथील नवीन बसस्थानक येथे १ जून रोजी सकाळी ७ वाजता एसटी बसची पुजा करून प्रवाशांना पेढे वाटप करून वाहतूक नियंत्रण व सहकाऱ्यांबरोबर बस स्थानकात ७७ वा वर्धापन दिवस उत्साहात साजरी केली.

सायंकाळी संपूर्ण बसस्थानकात लायटिंगची व्यवस्था केली होती. हार, रंगरंगोटी, दिवे, लायटिंग, अब्याचे तोरण, लावण्यात आले. तसेच संपूर्ण परिसर सकाळी स्वच्छ करण्यात आला व सकाळी ७ वाजता पूजा करण्यात आली.

एक बसची सजावट करण्यात आली. चव्हाण यांनी पाससेस ची माहिती सांगितली ज्या बसच्या भरवशावर व प्रवाशांच्या सहकार्यावर आपले व आपल्या कुटुंबाचे जीवन अवलंबून आहे. त्या प्रवाशांचे आभार मानणे हे आपले कर्तव्य आहे असे वाहतूक नियंत्रक रवी चव्हाण यांनी यावेळी बोलतांना सांगितले. यावेळी कर्मचारी अजय गायकवाड, सचिन खिलारे,शेषराव कुटे, डी. डी. नागरे,विशाल सावळे, सोनू धुळधूळे,विकास अवचार,रवी माने,लक्ष्मीन बर्डे,ए. पी.लाडकर, व्ही. के.गावंडे,बि. व्ही. धाड,जे. आर. राठोड,राजू पालवे,पी. ए.तोडकर,शालिकराम कड,व्ही. एम.मिरशे , शालू ताई शिंदे, ज्योतीताई सीताबराव आदींसह सर्व कर्मचारी उपस्थित होते. तसेच अजय चंद्रकांत गायकवाड यांनी आभार प्रदशन केले.यावेळी सर्व प्रवाशांना शुभेच्छा दिल्या.