बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ] .
पुसेगाव येथील येरळा नदी लगत अटाळी व मळवी येथे शिवारात नदी वर जुना बंधारा असून त्या वरून शेतकरी शेतामध्ये कामासाठी ये जा करीत असलेल्या बंधारया लगतचे पुर्ण 300 फुट सगळा भराव सततच्या अवकाळी पावसामुळे वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे सर्व कामे ठप्प झाली आहे
सदरची बाब नामदार श्री महेश शिंदे यांना सर्व शेतकऱ्यांनी सांगितली . तातडीने सदरची बाब लक्षात आल्यावर गाडी चालवताना रस्ता गुडघाभर चिखलातून नेली तेथे झालेल्या नुकसानीची पाहणी केली व संबंधित अधिकारी यांना ताबडतोब पंचनामा करून शेती कामासाठी रस्ता खुला करा व भविष्यात असे नुकसान होऊ नये म्हणून नविन पर्याय म्हणजे मजबूत पूल लवकरात लवकर बांधून देण्याची ग्वाही दिली.
याप्रसंगी संबंधित अधिकारी, विश्वस्त श्री रणधीरशेठ जाधव, सरपंच घनःश्याम मनसे, उपसरपंच विशाल जाधव, सदस्य गणेश मदने,सुरज जाधव माजी उपसरपंच चंद्रकांत जाधव सर्व पदाधिकारी व शेतकरी, ग्रामस्थ, कार्यकर्ते उपस्थित होते
Social Plugin