Ticker

6/recent/ticker-posts

बुध येथील हरिदास काटकर यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक



बुध  दि. (प्रकाश राजेघाटगे) 

बुध  येथील काटकर ड्रायक्लिनर्समध्ये सुधीर घाडगे यांनी साडी ड्रायक्लिनसाठी दिली होती. साडीमध्ये हरिदास वसंत काटकर  यांना ८००० रुपये सापडले. सापडलेली रक्कम संबंधित व्यक्तीला काटकर यांनी मोठ्या मनाने परत केली.

बुध , ता. खटाव येथील सुधीर घाडगे  यांनी बुधच्या काटकर ड्रायक्लिनर्समध्ये ड्रायक्लिनसाठी साडी दिली होती.  सुधीरची आई शेतामध्ये मजुरीची कामे करतात . आलेल्या पैशातून  बचतीसाठी साडीमध्ये पैसे ठेवत असत .  साडी ड्रायक्लिनसाठी देताना नजरचुकीने पैसे काढून घेण्याचे विसरले . पण  त्या साडीमध्ये काटकर यांना ८००० रुपये सापडले असता त्वरित घाडगे यांना मोबाईलवरून संपर्क साधून तुमचे पैसे सापडले आहेत, असे सांगून बोलवून घेतले. घाडगे यांचे सापडलेले आठ हजार  रुपये परत केले.

दरम्यान हरिदास काटकर  यांच्याकडे बुधसह पंचक्रोशीतून कपडे इस्त्री व ड्रायक्लिनर्ससाठी येत असतात. अनेक ग्राहकांचे अनावधानाने आलेले पैसे परत केले आहेत. हरिदास काटकर यांच्या प्रामाणिकपणा बद्दल कौतुक होत आहे.