Ticker

6/recent/ticker-posts

अंबड पोलीस ठाणे डी बी पथकाची कारवाई विधी संघर्ष बालकाकडुन चार जिवंत काडतुसोबत गावठी पिस्टल व धारधार तलवार केली जप्त



 अंबड तालुका प्रतिनिधी,गणेश सपकाळ

आज दिनांक 26/06/2025 रोजी 10-00 वाजताच्या सुमारास पोलीस ठाणे अंबड जि. जालना डी बी पथक राणीउंचेगाव भागात अवैध धंदे कारवाई व माहिती काढण्याकरीता गस्त करीत असतांना राणीउंचेगाव भागातील गोपनीय बातमीदाराकडुन माहिती की,राणीउंचेगाव भागात एक नविन ईसम आलेला असुन त्यांच्याजवळ धारधार तलवार व कमरेला पिस्टल असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली.मिळालेली माहिती डी बी पथकाने पोलीस ठाणे अंबड चे प्रभारी पोलीस अधिकारी श्री एस ए घोडके साहेब यांना व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल खांबे साहेब यांना दिली.वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे नमुद संशयीत ईसमास डी बी पथकाचे पोउपनि भगवान नरोडे,पोहेका 1169 यशवंत मुंढे,पोहेका 1272 दिपक पाटील व पोशिक्रं 344 अरुण मुंढे यांनी ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन 01 सिल्वर रंगाची पिस्टल,04 जिवंत काडतुसे व 01 धारधार तलवार मिळुन आल्याने त्यांला ताब्यात घेण्यात आले.पोलीस ठाणे अंबड येथे आल्यावर त्यांच्या वयाबाबत खात्री केली असता तो विधी संघर्ष बालक असल्याचे दिसुन आले आहे.तरी नमुद प्रकरणात पोलीस ठाणे अंबड जि.जालना येथे गुरन 342/2025 कलम 3/25 व 4/25 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन जप्त पिस्टल कोठे व कोणाकडुन खरेदी केली याबाबत अधिक तपास अंबड पोलीस करीत आहे.

सदरची कारवाई ही मा पोलीस अधिक्षक श्री अजयकुमार बन्सल साहेब,अप्पर पोलीस अधिक्षक श्री आयुष नोपानी साहेब,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल खांबे यांच्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस ठाणे अंबड चे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री संतोष घोडके,पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे,पोहेका 1169 यशवंत मुंढे,पोहेका 1272 दिपक पाटील व पोशिक्रं 344 अरुण मुंढे नेमणुक पोस्टे अंबड जिल्हा जालना यांनी केलेली आहे.