Ticker

6/recent/ticker-posts

सावली रस्त्यावर चक्काजाम आंदोलन

 


सावली प्रतिनिधी रोशन बोरकर

शेतकरी कर्जमाफी, असोला मेंढा व सावंगी दीक्षित यांच्या पुनर्वसन मागण्या आणि दिव्यांग बांधव यांना सहा हजार रुपये अनुदान अशा अनेक मागण्या घेऊन मा. बच्चू भाऊ कडु यांच्या मार्गदर्शनात प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रफुल भाऊ तुम्मे यांनी सिंदेवाही - सावली रस्त्यावर चाक्काजाम आंदोलन करून शासनाकडे रास्त मागण्या केल्या, यावेळी परिसरातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती. पाथरी येथील बस स्टँड पासून ते सावली - सिंदेवाही मार्गा पर्यंत बैल बंडीने नागरिकांसोबत शेतकरी कर्ज माफी आणि इतर मागण्या मान्य करा अशा घोषणा देत सावली - सिंदेवाही या मार्गा पर्यंत पोहचून तब्बल दीड तास मार्ग बंद केला होता,  आणि जर शासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर या पेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष तथा उपसरपंच ग्रामपंचायत पाथरी  प्रफुल भाऊ तुम्मे यांनी दिला.