Ticker

6/recent/ticker-posts

गुरुवर्य काळंगे विद्यालयामध्ये सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न.



  बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

मोळ ता. खटाव येथील श्री भैरवनाथ शिक्षण संस्था मोळ संचलित गुरुवर्य गणपतराव काळंगे माध्यमिक विद्यालय मोळ -मांजरवाडी या विद्यालयामध्ये विद्यालयातील कर्मचारी श्री कैलास ज्ञानदेव रामगुडे( शिपाई )आपली 25 वर्ष सेवा  केली, नियत वयोमानानुसार विद्यालयाने सेवापूर्ती गौरव समारंभ आयोजित केला.             

 या गौरव सोहळ्यासाठी श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  दिलीपराव काळंगे , पुसेगाव पोलीस स्टेशनचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण , रमाकांत नांगरे , गजानन वाघ , उत्तमराव घाटगे साहेब, संपतराव बोराटे, प्रकाश काळंगे, विश्वासराव गायकवाड आदि संचालक उपस्थित होते. मोळ ग्रामपंचायतचे उपसरपंच अमोल चीनके, अरुण वाघ, महेंद्र नांगरे, महादेव मोरे , विलास राजेघाटगे ,सुभाष बोराटे ,शंकर नांगरे,  चंद्रकांत वाघ, शामराव कर्णे, काटकर आबा, श्री बलराम घोरपडे सर,  पोलीस पाटील सौ पूजा पवार  मोळ, मांजरवाडी, डिस्कळ, पंचक्रोशी मधून  सर्व पालक, बंधू, भगिनी उपस्थित होते. सेवापूर्ती गौरव सोहळ्यामध्ये मार्गदर्शन करताना  संदीप पोमण  यांनी  विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन केले तसेच सत्कारमूर्तींना शुभेच्छा दिल्या, विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय गोडसे  यांनी सत्कारमूर्तींना शुभेच्छा देऊन भविष्यातील वाटचालीसाठी  सत्कारमूर्तींना, इतर पालकांना, आप्तेष्टांना मार्गदर्शन केले.

 सत्कारमूर्तींना शुभेच्छा देण्यासाठी रामगुडे परिवार, त्यांचे आप्तेष्ट मित्रपरिवार शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. सेवापूर्ती गौरव सोहळा समारंभाचे आयोजन गुरुवर्य गणपतराव काळंगे माध्यमिक विद्यालय मोळ मांजरवाडी मधील मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी आयोजन केले. मोळ, मांजरवाडी, डिस्कळ  आणि रामगुडे परिवार यांच्याकडून सत्कारमूर्तींचा सत्कार करण्यात आला शुभेच्छा देण्यात आल्या . राजेंद्र सस्ते, अशोक भोसले, अरुण वाघ, शिवाजी वाघ,  राजेंद्र काकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सत्कारमूर्ती श्री कैलास ज्ञानदेव रामगुडे यांनी सत्काराला उत्तर देत असताना शिक्षण संस्थेतील पदाधिकारी, काळंगे विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे ,उपस्थित सर्व पालकांचे स्वागत आणि आभार मानले.  प्रास्ताविक सौ. शिल्पाताई गोडसे  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिलीपराव साबळे सर ,आभार सौ ज्योतीताई करणे यांनी केले.