Ticker

6/recent/ticker-posts

हदगाव तालुक्यात वाळु माफिया वर तहसीलदार यांची धाडशी कारवाई....



    हदगाव तालुका (प्रतिनिधी) देवानंद महाजन . 

तालुक्यातील मौजे कोथळा पैनगंगा नदी पात्रातून रेती उपसा यंत्र, ट्रॅक्टर सह तीस ब्रास रेती जप्त केल्याची कार्यवाही एकट्या महिला तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे यांनी आज दि. ५रोजी दुपारी १२वा. सुमारास केली.    या घटनेमुळे तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली. याबाबत सविस्तर वृत्त असे की हदगाव शहराच्या उत्तरेकडे पैनगंगा नदी वाहते. अज्ञात काही लोक मशीनद्वारे नदीपात्रातून अवैद्य रेती काढत असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार नांदे यांना मिळाली. यावरून क्षणाचाही विलंब न करता त्या घटनास्थळी आपली खाजगी गाडी घेऊन चालकासह त्या पोहोचल्या. तहसीलदार आल्याचे पाहताच मशीन चालक व मजूर फरार झाले. 

शेतमालक रघुनाथ वानखेडे यांच्या शेतातील स्वराज्य ट्रॅक्टर क्रमांक एम ऐच २६बी क्यू९८०३ रेती उपसा मशीन, खोरे, यांच्यासह ३०ब्रास रेती जप्त करण्यात आली.ज्या ट्रॅक्टरवर गोपाळराव दिगंबर वानखेडे असे नाव होते. यानंतर सर्व साहित्य जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले असून जप्त करण्यात आलेली रेती शेतमालक रघुनाथ वानखेडे यांच्या ताब्यात देण्यात आली.  []एकट्या महिला तहसीलदारने घटनास्थळी जाऊन कार्यवाही केल्याची ही पहिलीच वेळ आहे . यामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून रेती चोरांचे धाबे दणाणले आहे. तहसीलदार यांच्या आदेशावरून मंडळ अधिकारी विजय महाजन, तलाठी विश्वजीत वडकुते, पोलीस पाटील विजय वानखेडे व पोलीस घटनास्थळी तातडीने  दाखल झाले.