शिरुर ग्रामीण प्रतिनीधी - (शैलेश जाधव)
सांगलीच्या यशवंत नगर येथे राहणाऱ्या सौ. ऋतुजा सुकुमार राजगे या सात महिन्यांची गरोदर आणि उच्चशिक्षित हिंदू महिलेने सासरच्या धर्मांतराच्या जबरदस्तीला कंटाळून आपले जीवन संपवले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, हिंदू समाजात संतापाचा उद्रेक झाला आहे.२८ जून २०२५ रोजी शिरूर शहरात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सकल हिंदू समाज , पुणे ग्रामीण यांच्या वतीने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला.मोर्चा मार्केट यार्ड येथून निघून तहसिल कार्यालय येथे पोहोचला, जिथे आक्रोश सभा झाली. "ऋतुजाच्या आत्म्याला न्याय मिळेपर्यंत हिंदू समाज शांत बसणार नाही!" मोर्चात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. हातात फलक – "धर्मांतर थांबवा!", "धर्मासाठी बलिदान, हीच खरी शौर्यगाथा!"
प्रमुख उपस्थिती
आमदार महेश लांडगे ह.भ.प. संग्राम बापू भंडारे सौ. वर्षा डहाळेशिरूर शहर व परिसरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना व कार्यकर्तेशिरुर शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, महिला भगिनी आणि हजारोंचे जनसमुदाय विश्व हिंदु परिषद बजरंग दल,हिंदु जागरण,धर्म जागरण श्री नरेंद्र महाराज सांप्रदाय,शिवबा संघटना टाकळी हाजीराष्ट्रीय स्वयंमसेवक संघ आणि शिवप्रतिष्ठान हिंन्दुस्थानआ. महेश लांडगे म्हणाले –"हे केवळ निषेध नाही, तर धर्मासाठीचे रणशिंग आहे. राज्यात धर्मांतर विरोधी कायदा तात्काळ लागू करावा लागेल."
विशेष बाब
बजरंग दलाचे कार्यकर्ते गेल्या दोन दिवसांपासून अहोरात्र शिरूर शहरात हातात फलक घेऊन जनजागृती करत होते. धर्मासाठी तहानभूक विसरून रात्रंदिवस मैदानात उतरलेल्या बजरंगी वीरांना संपूर्ण शिरूरचा सलाम! त्यांनी अल्प वेळात आंदोलनाची जबाबदारी खांद्यावर घेतली आणि चोख नियोजन करून जनसागर उभा केला. मोर्चाच्या प्रतिनिधींनी तहसीलदारांना निवेदन सादर केले. पोलिसांचा बंदोबस्त देखील चोख होता. शेवटी ऋतुजा राजगे यांना श्रद्धांजली वाहून न्यायासाठी एकजुट दर्शवण्यात आली. "हे रण हिंदू अस्मितेसाठी आहे – आणि आम्ही थांबणार नाही!"
Social Plugin