Ticker

6/recent/ticker-posts

अभ्यासाबरोबर आहार व व्यायामावर लक्ष द्या -डॉ. श्री सुरेशराव जाधव


 

 बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

 शिक्षण क्षेत्रात नवीन  बदल होत आहेत.कृत्रिम बुद्धिमत्ता सर्व क्षेत्रात येत आहे. संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना याबाबत विशेष शिक्षण दिले जाईल. विविध परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश संस्थेकरता तसेच सर्वांकरिता अभिमानास्पद आहे. विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावर लक्ष न करता आरोग्य व आहार  यावर लक्ष केंद्रित करावे. संस्थेच्या माध्यमातून सर्वच शाखातून दर्जेदार शिक्षण देऊन आदर्श पिढी घडवण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत. असे विचार श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगावचे अध्यक्ष डॉ.श्री सुरेशराव जाधव यांनी व्यक्त केले. श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव आयोजित इयत्ता दहावी बारावी विद्यार्थी सत्कार समारंभात ते बोलत होते.श्री हनुमानगिरी हायस्कूल येथे यशस्वी विद्यार्थी सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला .

 उपाध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव  यांनी विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीनुसार क्षेत्र निवडायचे आवाहन केले. तसेच तणावमुक्त  आनंदी जीवन जगण्याचा सल्ला दिला निवृत्त सनदी अधिकारी श्री सुरेशराव जाधव यांनी स्पर्धा परीक्षांचे महत्त्व विषद करून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी  सेवानिवृत्त झालेले श्री संजय वायदंडे  व श्री सदाशिव बनकर यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. डॉ.सुरेशराव जाधव यांच्या वतीने गरीब विद्यार्थ्यांकरता वह्यांचे वाटप करण्यात आले.

 कार्यक्रमास  सचिव श्री मोहनराव जाधव, डॉ.सुभाष आगाशे, श्री विष्णुपंत खटावकर,श्री सूर्यकांत जाधव, श्री जयंतराव जाधव, श्री विजयसिंह जाधव, श्री के. डी.पवार, श्री डी.पी.शिंदे,श्री दगडू दादा शिंदे,श्री राजेंद्र घाटगे पाटील, श्री हणमंत घनवट, ऍड. लावंड शिर्के,श्री ज्ञानेश्वर चव्हाण,प्रा.शकुंतला शिंदे,सौ रणसिंग मॅडम, श्री नौशाद मुल्ला, ज्ञानेश्वर चव्हाण,तसेच विविध शाखांचे मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्था विश्वस्त श्री योगेशराव देशमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.श्री मोहनराव गुरव, सौ. माधुरी चव्हाण  व सौ अमृता जाधव यांनी सूत्रसंचालन केले.श्री एस.आर. पाटील यांनी आभार मानले.