Ticker

6/recent/ticker-posts

पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसा निमित्त दिग्रस येथे आरोग्य संकल्प अभियान



 राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस 

राज्याचे मृद व जलसंधारण गंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त दिप्रस येथे आरोग्य संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे. हे शिविर रविवार, १५ जून रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत दिनबाई महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे.आरोग्य सेवा समिती यवतमाळद्वारा आयोजित आणि दत्ता मेघे शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबाभावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या आरोग्य अभियानात मोफत रोगनिदान, शस्त्रक्रिया, उपचार व औषधी वाटप करण्यात येणार आहे. तरोच महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि इतर योजनांच्या माध्यमातून आजारांवरील उपचार मोफत केले जातील.तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासगी शिबिरात विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून हृदयविकार तपासणी (ईसीजी, टीएमटी, इको), सानाच्या कर्करोगाची तपासणी (मॅमोग्राफी), सोनोग्राफी, सिटी स्कॅन, एमआरआय, एक्स-रे, मधुमेह, रक्तदाब, डोळ्यांचे आजार, कान-नाक-घसा, दमा, खोकला, किडनी, प्रोस्टेट, थायरॉईड, मुळव्याध, हर्निया, गाठी, संधीवात, त्वचा रोग, गानसिक आजार, मिरगी, नतिमंदता, लहान मुलांचे आजार, दातांचे आजार, ओठ व तालुंचे आजार आदि सेवा दिल्या जाणार आहे.

रुणांसाठी दारव्हा, दिग्रस आणि नेर येथून मोफत वाहतूक सुविधा, तसेच भरती रुणांसाठी राहण्याची, जेवणाची आणि औषधांचीव्यवस्था आयोजकांकडून मोफत केली जाणार आहे. एका नातेवाईकाची जेवणाची सोयही केली जाईल. शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांनी आधारकार्ड व रेशन कार्डाची झेरॉक्स प्रत सोबत आगणे आवश्यक आहे.या आरोग्य शिबिराचा लाभदिग्रस तालुक्यातील नागरिकांनी आवश्य घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी स्थानिक शिवसेना शाखा प्रमुखांशी संपर्क साधावा.