बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.
बिलोली तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांची नुकतीच नांदेड येथे बदली झाली असल्याने त्यांच्या ठिकाणी विक्रम हराळे हे नवीन सहाय्यक पोलीस निरीक्षक रुजू होत पदभार स्विकारला आहे.
बिलोली तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप हे २ फेब्रुवारी २०२४ रोजी पदभार स्विकारला होता. १६ महिने काम पाहिले. त्यांची ११ रोजी नुकतीच नांदेड येथील कंट्रोल रूम येथे बदली झाली आहे. त्यांच्या ठिकाणी रामतीर्थ पोलीस ठाणे येथे नुतन स.पो.नि.विक्रम हराळे हे बदली होऊन आले असल्याने त्यांचे रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या वतीने स्वागत करण्यात आले. तर येथून बदली होऊन जाणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांना रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या वतीने १३ जून रोजी निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करून त्यांना निरोप देण्यात येणार आहे.
Social Plugin