बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ].
नवीन शैक्षणिक धोरणातले प्रवाह पेलण्यास आपल्या संस्थेतील विद्यार्थी सक्षम आहेत. विद्यार्थी सर्वांगीण विकासाकरता संस्था विद्यार्थ्यांना कायम मदतीचा हात पुढे करेल व त्यांच्या भविष्यास योग्य आकार देईल. पालक,विद्यार्थी व शिक्षक यांचा योग्य समन्वय असणे गरजेचे आहे. तसेच प्रभावी संवादातून आदर्श विद्यार्थी घडतील असा विश्वास श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगावचे अध्यक्ष डॉ.श्री सुरेशराव जाधव यांनी व्यक्त केला. ते इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय पुसेगाव येथील नवागतांच्या स्वागत प्रसंगी बोलत होते.
यावेळी ह. भ. प. श्री स्वानंद महाराज यांनी मनोगत व्यक्त करताना गुरुची महती व्यक्त करून संस्काराचे महत्त्व विशद केले. यावेळी विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते स्कूल किट वाटण्यात आले तसेच मोफत पाठ्यपुस्तकाची वितरण करण्यात आले
कार्यक्रमास संस्था सचिव मा. श्री मोहनराव जाधव, विश्वस्त श्री योगेशराव देशमुख, श्री एस. आर. पाटील, गुणवत्ता वाढ प्रकल्प अधिकारी श्री के.डी. पवार, प्राचार्य श्री डी. एन. गोफणे,श्री जे. टी. जाधव, सौ हेमलता फडतरे, सौ लाड एस. जे. ग्रामपंचायत सदस्य सौ जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. नवनियुक्त मुख्याध्यापिका सौ. नीलम खटावकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले
श्री लहारे ए.एम.यांनी सूत्रसंचालन केले सौ. दिपाली ठोंबरे यांनी शिक्षक मनोगत व्यक्त केले
Social Plugin