सेल्फी पॉईंट ठरले आकर्षणाचे केंद्र
देगलूर: आज शाळेच्या पहिल्या दिवशी तालुक्यातील चालुक्य कालीन नगरी येरगी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत नूतन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले आणि विद्यार्थ्यांना पुस्तके आणि पेन्सिल चे वाटप करण्यात आले. प्रदीर्घ उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व वर्ग मित्रांची भेट झाल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
आज शाळेत आलेल्या नूतन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉईंट उभे करण्यात आले होते.त्यास विद्यार्थ्यांचा भरपूर प्रतिसाद होता. या वेळी गावचे सरपंच संतोष पाटील यांच्या हस्ते पुस्तकांचे व पेन्सिल चे वाटप करण्यात आले.सरपंच संतोष पाटील यांनी यावेळी आपले शालेय जीवन आठवल्याचे सांगितले.यावेळी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष गजानन भोकसखेडे, मुख्याध्यापक अशोक देवकत्ते सर, ग्रामपंचायत सदस्य अशोक बरसमवार, अशोक वाघमारे, तंटामुक्त अध्यक्ष सायलू कांबळे, शालेय शिक्षण सदस्य रमेश गटावार, इरवंत काळीगवार, मन्मथ मटपती, ईश्वर वाडीकर,राहुल ढगे,भुमन्ना तेलग, रमाकांत वाघमारे, हणमंत थावरे, पोस्ट मेन सोमनाथ सर, आदी अंगणवाडीतील सर्व कर्मचारी, विद्यार्थी, आदी उपस्थित होते.
Social Plugin