प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे मेहकर
मंगरुळ नवघरे येथिल जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य वसंतराव गाडेकर गुरुजी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यपुर्ण दर्जेदार शिक्षण देण्याच्या दृष्टीने यावर्षी उन्हाळ्याची सुटी न घेता उन्हाळी अध्ययन - अध्यापन वर्ग नियमितपणे सुरु ठेवून आपल्या कर्तव्याचा ठसा उमटवत शिक्षकांसमोर वेगळा आदर्श निर्माण केला असून स्पर्धेच्या युगात आपल्या जि . प . च्या शाळा वाचविण्यासाठी शर्थिचे प्रयत्न चालविले आहेत याची गावकऱ्यांनी दखल घेतली आणि त्यांचा शाळेत जाऊन शाल व पुस्तक भेट देत नुकताच सत्कार केला आहे .
याप्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरीक तथा माजी सरपंच मनोहरभाऊ शिंदे , जि .प . हायस्कूल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ . रामेश्वर धमक , जि . प . प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नारायण आंभोरे , नितीनशेठ तांबट , माजी सरपंच मुरलीधर जाधव , माजी सरपंच अनिल आंभोरे , स्वप्नील कठाळे , किशोर आंभोरे , रामदास साहेब अंभोरे, बंडू अंभोरे, गणेश नवघरे, सोनू अंभोरे, विजय जाधव, रवी वाकडे व इतर ग्रामस्य उपस्थित होते .
Social Plugin