अलिबाग(रत्नाकर पाटील)
"मराठी ही फक्त एक भाषा नाही, तर ती संस्कृती आहे, हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे मराठी संस्कृतीवरील हा हल्ला आहे, तो आम्ही परतवून लावू, हिंदी भाषा रेटण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. तो आम्ही सहन करणार नाही," असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ अलिबाग येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.
'ओळख स्वतःची, विश्वाची व परिकल्पनेतील भारताची' या विषयावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रविवारी अलिबाग येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, "मी पूर्णवेळ एक कार्यकर्ता आहे. माणूस आणि प्राणी यांत निश्चितच फरक आहे. तो आपण समजून घेतला पाहिजे. कारण आपला मेंदू हा मल्टिप्रोसेसर आहे. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपण पुढे गेले पाहिजे. भारतीय संस्कृती महान आहे. तिच्यात दायित्व आहे. त्यामुळे आपण स्वतःला अधिकाधिक विकसित केले पाहिजे."
कॉंग्रेसची विचारधारा आणि आजपर्यंतची वाटचाल' याविषयी माजी आमदार रामहरी रूपनवर, 'कॉंग्रेस पक्ष स्थापना, उपलब्धी, कॉंग्रेसची देशाला गरज' माजी आमदार उल्हास पवार, 'पक्षाची विचारधारा, कार्यकर्त्यांना पक्षात संधी' महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य आणि प्रवक्ते सचिन सावंत आदींनी आपले प्रबोधनपर विचार मांडले.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी रात्री कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या सुमधुर गीतांचा आनंद घेतला. गायक नाना गडकरी आणि मोहन पुंडेकर यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांची मने जिंकली. 'चिठ्ठी आयी है, वतनसे चिठ्ठी आयी है' हे कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी गीत सादर करून कार्यकर्त्यांची मने जिंकली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आदित्य घरत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी उल्हास पवार, सचिन सावंत, यशराज पारखी यांचा सन्मान महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
हे प्रशिक्षण शिबिर आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झाले.
Social Plugin