Ticker

6/recent/ticker-posts

कदम परिवाराने जपली सामाजिक बांधिलकी-पिलानवाडी येथे दोन बस थांबे उभारण्यात आले



 दौड तालुका प्रतिनिधी -कानिफनाथ मांडगे 

दौंड -राहू:

पिलानवाडी ता. दौंड येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे संचालक स्वर्गीय पांडुरंग तुकाराम कदम व विठ्ठल तुकाराम कदम यांच्या पुण्यस्मरणार्थ कदम परिवाराकडून राहू -वाघोली रोडवर डुबेवाडी फाटा व पांडुरंग नगर (कदम पाटील स्कूल) येथे सामाजिक बांधिलकी जपत मोफत दोन बस थांबे बसवण्यात आले. त्यांच्या या कार्याबद्दल परिसरातील प्रवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

पारगाव वाघोली रोडवरील पिलानवाडी येथील प्रवाशांची प्रवासादरम्यान होत असलेली गैरसोय कदम परिवाराने पाहून दोन बस थांबे उभारण्याचे ठरवले व ते पुण्यस्मरणाच्या निमित्ताने पूर्ण केले. या मार्गावर एसटी बस पीएमपीएल बस फेऱ्या मोठ्या प्रमाणावर चालू असतात परंतु प्रवासादरम्यान त्यांना ऊन, वारा ,पाऊस, थंडी यामध्ये त्रास सहन करावा लागत होता मात्र या नव्याने दिलेल्या बस स्थान थांब्यामुळे शालेय विद्यार्थी ,वयस्कर व्यक्ती व इतर प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. पुण्यस्मरणानिमित्त विविध खर्चाला कात्री देत सामाजिक कार्य केल्याबद्दल तालुक्यातून त्यांचे कौतुक केले जात आहे 

     याप्रसंगी कदम परिवारातील उद्योजक विलास कदम, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याची संचालक ज्ञानदेव कदम, पोलीस पाटील लक्ष्मणराव कदम, रामदास ट्रान्सपोर्टचे संचालक रामदास कदम ,राजेंद्र कदम, नवनाथ कदम इत्यादी उपस्थित होते.

आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून आमच्या कदम परिवारांनी एक सामाजिक कार्य करावयाचे ठरविले व पुण्यस्मरणार्थ सामाजिक कार्य केले व भविष्यात यापुढील पुण्यस्मरणार्थ सामाजिक कार्यात निश्चित हातभार लावू अशी माहिती लक्ष्मण कदम पोलीस पाटील पिलानवाडी यांनी दिली.