बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाची कार्यकारी मंडळ सभा राष्ट्रभाषा भवन, संभाजीनगर, सातारा येथील राष्ट्रभाषा हिंदी भवन मध्ये मोठ्या उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडली. अध्यक्षस्थानी पूर्व अध्यक्ष अनिलकुमार जोशी होते. या सभेला राज्यातील हिंदी अध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रारंभी महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे माजी उपाध्यक्ष ता. का. सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक करत कार्यकारिणीच्या गेल्या कार्यकाळाचा आढावा घेतला. यानंतर पुढील कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणी निवडीची प्रक्रिया पार पडली. यावेळी महाराष्ट्र राज्य हिंदी महामंडळाची नवीन कार्यकारिणी निवड खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आली.
अध्यक्षपदी ता.का.सूर्यवंशी (सातारा), उपाध्यक्षपदी शिवाजी रामचंद्र आडसूळ ( सांगली), राजेंद्र लक्ष्मण खांबे (रत्नागिरी), संजय नारायण गावडे (कोल्हापूर हिंदी प्रचार प्रसार ) व सुरेश कृष्णा कोडग (सोलापूर), सचिवपदी हणमंत रामचंद्र सूर्यवंशी (सातारा) सहसचिवपदी आप्पासो तुकाराम पाटील (सांगली) व उस्मान जंगलुद्दीन मुलाणी (पुणे), कोषाध्यक्षपदी शाहनवाज इनायतुल्ला मुजावर (सातारा) या सर्व पदाधिकार्यांची एकमताने निवड करण्यात आली.
तसेच सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी अनिलकुमार जोशी तर सदस्यपदी रामानंद पुजारी, राजाराम टपळे, विठ्ठल शिंदे व शिवाजीराव कोकाटे यांचीही एकमताने निवड करण्यात आली.
या निवडीत राज्याच्या सदस्यांनी एकमताने सहभाग नोंदवत उत्साही वातावरण निर्माण केले. मंडळाच्या भावी कार्ययोजनांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी हिंदी विषयाच्या गुणवत्तापूर्ण अध्यापना- साठी विविध उपक्रम राबवण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.
कार्यकारिणी निवडीनंतर सर्व नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सत्कारास उत्तर देताना नूतन अध्यक्ष ता.का. सूर्यवंशी सर म्हणाले, आपल्या सर्वांच्या इच्छेनुसार मी हे पद स्वीकारत असून सर्वांनी एकदिलाने हिंदी भाषेवरील षडयंत्र परतावून लावण्यासाठी व ' हिंदी पढो, आगे बढो, भारत जोडो ' चा नारा सार्थ ठरविण्यासाठी साथ व सहकार्य करावे.त्यास सर्वांनी अनुमती देत ता. का. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदीचा लढा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
स्वागत सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने करण्यात आले.सूत्रसंचालन ता. का.
सूर्यवंशी यांनी केले, तर आभार शाहनवाज मुजावर यांनी मानले.





Social Plugin